करवीरला सहानुभूतीची लाट, राहूल पाटील यांचा प्रचार सुसाट
कोल्हापूर
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर होत असलेल्या करवीर विधानसभा मतदार संघात सध्या सहानुभूतीची लाट आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राहूल पाटील यांचा प्रचार सुसाट असल्याचे चित्र संपूर्ण मतदार संघात दिसत आहे. गावागावात त्यांच्या प्रचार सभा, पदयात्रा, कोपरा सभाना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. साहेबांच्या माघारी, आपली जबाबदारी असे म्हणत महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते मनापासून प्रचारात सहभागी झाल्याने पाटील यांची हवा झाली आहे.
पी. एन. पाटील हे आमदार असताना करवीर मतदार संघात त्यांनी कामाचा डोंगर उभा केला आहे. गावागावात विकासाची गंगा त्यांनी पोहोचवली आहे. वाड्या वस्त्यावर त्यांनी विकासकामे केली. न मागता अनेक गावांना निधी दिला. केवळ आपल्या कार्यकर्त्यांचीच नव्हे तर सर्व जनतेची कामं करणारा नेता ही त्यांची ओळख होती. प्रत्येक गावात त्यांचा गट भक्कम आहे. निष्ठावंत नेता म्ह्णून त्यांची ओळख. यामुळे या निष्ठावंत नेत्याला खरी श्रद्धांजली वाहण्यासाठी साहेबांच्या माघारी आमची जबाबदारी म्ह्णत सर्वजण राहूल पाटील यांच्या प्रचारात उतरले आहेत. प्रत्येक गावात पाटील यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या तीन चार महिन्यात राहूल यांनी गाव टू गाव आणि घर टू घर प्रचार केला आहे. सहानुभूतीचे वारे मतदार संघात आहे. यावर लाटेवर स्वार होण्यासाठी पाटील सज्ज झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात मनापासून उतरले आहेत. शेकापचे नेते संपतबापू पाटील यांनी त्यांना पाठिंबा दिल्याने मोठे बळ मिळाले आहे. भोगावती कारखाना, राजीव गांधी सूतगिरणी, श्रीपतराव दादा बँक अशा अनेक सहकारी संस्थांचे पाठबळ, गावागावात असलेली काँग्रेसची सत्ता यामुळे पाटील यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे. गोकुळचे अनेक संचालक त्यांच्या प्रचारात उतरले आहेत.
लोकांत मिसळणारा राहूल पाटील यांचा स्वभाव आहे. तोच सध्या जनतेला भावत आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली. संपर्क वाढवला. निधी दिला. यामुळे गावागावात त्यांच्या प्रचारयात्रेला उस्फूर्त स्वागत होत आहे. त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील हे त्यांच्या प्रचाराची सूत्रे हलवत आहेत. कार्यकर्त्यांनीच ही निवडणुक हातात घेतल्याने राहूल यांची मोठी हवा झाली आहे.