करवीरच्या विकासाचा दिप चंद्रदिप नरके – शैलेजादेवी नरके

Spread the news

करवीरच्या विकासाचा दिप चंद्रदिप नरके – शैलेजादेवी नरके

कोपार्डे -आपल्या कुटुंबाची जबाबदारी जनतेवर न टाकता जनतेलाच आपले कुटुंब मानून स्वतःवर जबाबदारी घेणारा चंद्रदीप हा विकासाचा दिप आहे. मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखासाठी वेळ देणाऱ्या चंद्रदीप नरके यांना भरघोस मताधिक्याने विजयी करा असे आवाहन माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या मातोश्री शैलेजादेवी नरके यांनी केले.
कळे जिल्हा परिषद मतदार संघातील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष शुभांगी पवार होत्या.राजलक्ष्मी नरके,शिल्पा नरके यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी शैलजादेवी नरके म्हणाल्या चंद्रदीप नरके मातीत राबणारा सामाजिक कार्यकर्ता आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रदीपनी सहकार महर्षी स्वर्गीय डी.सी. नरके यांच्या विचारांचा वारसा घेऊन ग्रामीण भागाबरोबरो शेतकरी हिताचे काम केले आहे.मतदासंघातील प्रत्येक महिलेला आपला भाऊ असल्याची भावना त्यांच्या कामातून निर्माण केली आहे.चंद्रदीप नरके यांच्या विजयासाठी शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य महिला पुढे सरसावल्या असून २३ तारखेला विजयाचा गुलाल नक्की आहे असे शैलजादेवी यांनी सांगितले .
यावेळी शिल्पा नरके म्हणाल्या करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ कळे असून या बाजारपेठेतील मुख्य रस्त्याची दुरावस्था पहावत नव्हती. लोकप्रतिनिधीनी याकडे दूर्लक्ष केले.पण पद नसतानाही सात कोटीचा निधी मंजूर करून रस्ता व गटारीचा प्रश्न सोडवला आहे. लवकरच हे काम सुरू होईल. पद नसताना मतदारसंघात १०० कोटीचा निधी आणला आहे.तुमचा लाडका भाऊ चंद्रदीप यांचे महिलांनी हात बळकट करावे असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा महिला शिवसेनाप्रमुख शुभांगी पवार यांनी चंद्रदीप नरके यांना आपल्या मताचा आशीर्वाद द्यावा.यावेळी ते मंत्रिमंडळात मंत्री होणार आहेत. यामुळे मतदार संघाचा कायापालट होणार असल्याचे सांगितले. देविका नरके फाटक,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील,डॉक्टर सुप्रिया नरके पाटील,लोक जनशक्ती महिला अध्यक्ष प्रियांका कांबळे, कोमल चौगले (पुनाळ), कोमल सावंत (कोदवडे),अरुण पाटील (सावर्डे), यांनी मनोगते व्यक्त केली.रवींद्र चौगले यांनी मानले.
यावेळी कुंभी कारखान्याच्या संचालिका धनश्री पाटील,प्रमिला पाटील, माजी सरपंच इंदुबाई पाटील,पंचायत समिती सदस्य रेखा बोगरे,ललिता बाटे,रेखा पाटील,कळे उपसरपंच शांताबाई झुरे, पौर्णिमा ढेरे, प्रियंका पाटील,संपदा वरुटे, राजश्री चौगले, सुमन पाटील,सुप्रिया पाटील,धनवंती नरके, मनीषा पाटील,रवी चौगले, प्रधान पाटील, वसंत आळवेकर ,राऊ पाटील,अरुण पाटील, रवी चौगले यांनी आभार मानले.
चौकट
माझे सौभाग्य चंद्रदीप भावाने वाचवले – माझे पती आजारी पडले.जिल्ह्यातील एकही नेता त्यांची विचारपूस करायला आला नाही.
१५ दिवस पोटात अन्नाचा तुकडा नव्हता. चंद्रदीप नरके घरी आले आणि माझ्या पतीने भाकरीचा एक तुकडा खाल्ला.यानंतर त्यांची प्रकृती सुधारली. माझे सौभाग्य माझा भाऊ चंद्रदीप नरके यांनी परत केल्याची भावना शुभांगी पोवार यांनी व्यक्त करताच सभागृह गहिवरले.

धामणी प्रकल्पाचे श्रेय चंद्रदीप नरके यांचे कडून हिसकावून घेऊ पाहणाऱ्या विरोधकांना माझे खुले आव्हान आहे त्यांनी समोरासमोर येऊन आपला दावा करावा धामणी खोऱ्यातील जनतेला माहित आहे की चंद्रदीप नरके यांनीच धामणी प्रकल्पाचे काम मार्गी लावले आहे असे हरपवडे येथील नंदाताई चौगले या महिलेने सांगितले


Spread the news

You may also like

error: Content is protected !!