करवीर नरके तर राधानगरीतून प्रकाश आबिटकर यांना उमेदवारी उत्तर वेटिंग वरच

Spread the news

करवीर नरके तर राधानगरीतून प्रकाश आबिटकर यांना उमेदवारी

उत्तर वेटिंग वरच

कोल्हापूर महायुतीतील शिवसेना शिंदे गटाने आपली पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये करवीर मतदारसंघातून चंद्रदीप नरके तर राधानगरीतून आमदार प्रकाश आबिटकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कोल्हापूर उत्तर मात्र वेटिंग वरच आहे. महायुतीच्या नेत्यांनी आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर केल्याबद्दल नरके आणि आबिटकर यांनी सर्वांचे आभार मानले असून आपण हा विश्वास सार्थ करू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

चंद्रदीप नरके हे करवीर मधून दोन वेळा आमदार झाले आहेत. आबिटकर देखील दोन वेळा आमदार झाले असून आता हॅट्रिक साठी ते मैदानात उतरत आहेत. शिंदे गटाने रात्री 54 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये या दोघांचा समावेश आहे.

शिरोळ राजेंद्र यड्रावकर हे स्वतंत्र लढण्याची शक्यता आहे. हातकणंगले मतदारसंघावर ही शिंदे गटाने दावा केला असून तेथे अलका स्वामी आणि सुजित मिंचेकर यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!