कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट* -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

Spread the news

  • *कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट*
    -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचे यश

कोल्हापूर –
कर्करोगावरील ‘हायपरथर्मिया’ उपचारासाठी आवश्यक असलेल्या अ‍ॅमिनेटेड चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करणाऱ्या संशोधनासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना पेटंट मिळाले आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी स्टडीजमधील प्राध्यापक डॉ. विश्वजीत खोत, संशोधक विद्यार्थी डॉ. सतिश फाळके आणि राजाराम कॉलेजच्या डॉ. अश्विनी साळुंखे यांनी हे संशोधन केले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ४९ वे पेटंट असून या संशोधनामुळे भविष्यात कर्करोगावर अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार शक्य होणार आहेत.

  1. U­

 


सध्या कर्करोगावर किरणोपचार, रासायनिक उपचार आणि शस्त्रक्रिया यांसारख्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. मात्र या उपचार पद्धतीमध्ये आरोग्यदायी पेशींवर होणारे दुष्परिणाम, उपचारांसाठी होणारा मोठा खर्च आणि मर्यादित प्रभाव यांसारख्या अडचणी आढळतात. मात्र, चुंबकीय नॅनो कणांच्या मदतीने अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार शक्य होऊ शकते.

  •  

डॉ. विश्वजीत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी डॉ. सतिश फाळके आणि डॉ. अश्विनी साळुंखे (भौतिकशास्त्र विभाग, राजाराम कॉलेज) यांनी रासायनिक पद्धतीचा वापर करून अ‍ॅमिनेटेड चुंबकीय नॅनो कणांचे संश्लेषण केले. या कणांचे वैशिष्ट्य म्हणजे ते थेट कर्करोग पेशींशी जोडले जातात आणि बाह्य चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाने उष्णता निर्माण करतात. या प्रक्रियेमुळे ४० ते ४८ अंश सेल्सियस तापमान निर्माण होते, ज्यामुळे कर्करोग पेशी नष्ट होतात. हे संशोधन कर्करोग उपचारातील नवी क्रांती ठरण्याची शक्यता असून, भविष्यात अधिक सुरक्षित आणि प्रभावी उपचार पद्धती विकसित करणे शक्य होणार आहे.

या संशोधनासाठी सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी संशोधकांचे अभिनंदन केले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!