इचलकरंजी बार असोसिएशन मदन कारंडे यांच्या पाठीशी कारंडे यांनी साधला वकिलांसोबत संवाद

Spread the news

 

इचलकरंजी बार असोसिएशन मदन कारंडे यांच्या पाठीशी

कारंडे यांनी साधला वकील यांच्याशी संवाद

 

इचलकरंजी : येथील बार असोसिएशनला महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी वकिलांसोबत संवाद साधत बार असोसिएशनच्या सदस्यांच्या समस्या, मागण्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. मदन कारंडे यांनी न्यायिक क्षेत्राच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत, वकिलांच्या कार्यासाठी आवश्यक सुविधा आणि संसाधनांची व्यवस्था करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, इचलकरंजी बार असोसिएशनच्या सदस्यांनी कारंडे यांच्या नेतृत्वाचे स्वागत केले आणि त्यांच्या कामकाजाबाबत सकारात्मक भावना व्यक्त केली. मदन कारंडे यांनी स्थानिक न्यायालयीन व्यवस्थेचा विकास, वकिलांच्या कल्याणासाठी उपयुक्त योजना, तसेच न्यायालयीन पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अध्यक्ष ऍड. आर आर तोष्णीवाल, उपाध्यक्ष ऍड. आर. एस. सुतार, सेक्रेटरी ऍड. अभिजित माने, जॉ. सेक्रेटरी ऍड. आदित्य मुदगल, ऍड. विजय शिंगारे, ऍड.राहुल काटकर, ऍड.शैलेंद्र सातपुते,ऍड. चुडमुंगे, ऍड.इरफान जमादार, ऍड. डी. डी. पाटील, ऍड. बाबासाहेब सूर्यवंशी, ऍड. समोडोळे, ऍड. गजबी, ऍड.खंजिरेसो, ऍड. बी. के. हिरेमठ (स्वामी), ऍड. विशाल जाधव, ऍड. शिवराज चुडमुंगे ऍड. पटेल, ऍड. सुनील कुलकर्णी, ऍड. आरेकर, ऍड. दीपाली हणबर, ऍड.शेख, ऍड. पंकज मुळे, ऍड.जैंद मॅडम, ऍड. राहुल काटकर व इतर सिनिअर व जुनिअर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!