प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्यातील सर्व सरकारी विभागाकडील कंत्राटदार यांचे देयके गेल्या आठ महिन्यापासून दिली गेली नाही. तसेच कंत्राटदार यांच्या महत्त्वाचे मागण्यांबाबत कायम दुर्लक्ष केले जात आहे, या सर्व गंभीर गोष्टी चा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी राज्यात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, राज्य अभियंता संघटना, राज्य लेबर फेडेरेशन , हॉट मिक्स असोसिएशन या संघटनांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात विविध संघटनेच्या सदस्य व पदाधिकारी यांच्या वतीने शासकीय फुकट वाटप धोरणांचा निषेध केला, तसेच राज्यातील विकासांची कामे केलेल्या कंत्राटदार जाणीवपूर्वक देयके न देणे व त्यांच्या इतर मागण्यांबाबत शासनाकडून कायम दुर्लक्ष करणे, या बाबींचा समाचार सदर आंदोलनात घेण्यात आला.
बजेट मध्ये आर्थिक नियोजन शुन्य कारभार, तसेच सदर मार्च मध्ये कंत्राटदार यांची शासनाकडून देयके न मिळाल्यास सदर वित्तीय संस्थाचे कंत्राटदारवर ओढावणारे आर्थिक संकट यामुळे कंत्राटदार व त्यांचे कुटुंब व त्यावर अवलंबून असणारे लाखो घटकांचे संसार उद्ध्वस्त होणार तर आहेतच तसेच कंत्राटदार यांचा आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे घटक असलेला CIBIL हा घटक प्रचंड खालच्या स्तरावर येणार आहे. तसेच राज्याची पुढील काळात गंभीर होणारी आर्थिक परिस्थिती यामुळे सदर व्यवसाय अडचणीत येणार आहे. अशी भिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले व महासचिव सुनील नागराळे यांनी व्यक्त केली.
सदर आदोलन राज्यातील जवळपास २५ जिल्हा मध्ये बहुसंख्येने उपस्थित असलेल्या कंत्राटदार यांच्या उपस्थितीत पार पडले. या सर्व आंदोलन व इतर गोष्टी चा विचार न झाल्यास पुढील आंदोलनचा करण्याचा इशारा अध्यक्ष इंजि मिलिंद भोसले व महासचिव सुनील नागराळे यांनी दिला आहे.
कोल्हापुरात झालेल्या आंदोलनात व्ही.के. पाटील, सुनील नागराळे, श्रीशैल नागराळ, शिवाजी काशीद, संजीव श्रेष्ठी, विजय सावंत, स्वप्नील पाटील, जयसिंग पाटील, प्रशांत देसाई, युवराज चौगले यांच्यासह अनेकांचा समावेश होता.