Spread the news

कळंबा कारागृहात मोबाईलचा ढीगच

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्याकडे मोबाईलचा ढिगच सापडत असल्यामुळे येथील एकूणच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी अनेकदा कारवाई करूनही मोबाईल आत जाण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कोल्हापुरातील कळंबा कारागृहात बुधवारी 46 मोबाईल सापडले. यापूर्वी 100 मोबाईल सापडले होते. त्यामुळे दोन अधिकाऱ्यासह बारा जणावर निलंबनाची कारवाई झाली. दोन अधिकाऱ्यांची
तडकाफडकी बदली करण्यात आली. तरीही कारागृहात मोबाईल सापडण्याचे प्रमाण थांबलेले नाही. स्वच्छतागृह, शौचालय, मातीचे ढिगारे अशा ठिकाणी हे मोबाईल सापडत असून सिम कार्ड आणि बॅटरीही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. यामुळे मोबाईल आत जातात कसे? असा प्रश्न उपस्थित होत असून कारागृहाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!