*कागल -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दिसली वर्दीतली माणुसकी……!* *अपघातातील गंभीर जखमीला पोलीस वाहनाने तातडीने उपचारासाठी नेले*

Spread the news

*कागल -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर दिसली वर्दीतली माणुसकी……!*

*अपघातातील गंभीर जखमीला पोलीस वाहनाने तातडीने उपचारासाठी नेले*

*माहिती मिळताच सहाव्या मिनिटात पोचले पोलीस*

*कोल्हापूर, दि. १६:*
*आज सोमवार दि 16 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी पावणे अकरा वाजताची वेळ. कागल- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मयूर पेट्रोल पंपाजवळ एका आयशर ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या धडकेत डोकीसह चेहऱ्याला जोरदार मार लागल्यामुळे तो अज्ञात पादचारी गंभीर जखमी झाला व बेशुद्ध अवस्थेत गेला. जवळच असलेल्या हायवे पोलीस मदत केंद्राला कुणीतरी माहिती दिली आणि अगदी सहाव्या मिनिटाला तातडीने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अपघातस्थळी पोहोचले. पोलीस घटनास्थळी येताच अपघातग्रस्त आयशर कंटेनर एका बाजूला घेऊन महामार्गाची वाहतूक सुरळीत करीतच पोलिसांनी गंभीर जखमीला पोलीस हायवे पेट्रोलिंगच्या पोलीस वाहनामध्ये घेऊन तातडीने सीपीआर गाठले. खाकी वर्दीतील या माणुसकीला मीही अंतकरणापासून सॅल्यूट ठोकला आणि पुढे मार्गस्थ झालो.*

*कागल- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मयूर पेट्रोल पंपाजवळ सकाळी पावणे अकरा वाजता हा अपघात झाला. अज्ञात पादचारी पूर्वेकडून पश्चिमेकडे रस्ता ओलांडत असताना कागलकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या आयशर कंटेनर ट्रक: HR38 AF 9234 ने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाला व बेशुद्ध पडला. हायवे पेट्रोलिंगचे पोलीस वाहन क्र. MH09 FQ 6308 ने जखमीला दवाखान्यात नेले.*

*खाकीची तत्परता आणि माणुसकी………*
*दुर्घटनेची माहिती मिळतात उजळाईवाडी महामार्ग पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव, हेडकॉन्स्टेबल जावेद गडकरी, आकाश पाटील, ग्रेड पी.एस.आय. दीपक ठोंबरे आदी सहकाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ म्हणजे अवघ्या सहा मिनिटात दुर्घटना स्थळी पोहोचले. थांबलेली वाहतूक सुरळीत करत पोलिसांनी कर्तव्यही बजावले आणि गंभीर जखमीला तातडीने उपचारासाठी दाखल करीत माणुसकीही दाखवली.*
………………..

*कागल -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर मयूर पेट्रोल पंपाजवळ आयशर कंटेनरने ठोकल्याने गंभीर जखमी झालेल्या अज्ञात पादचा-याला बेशुदावस्थेत उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले.*
============


Spread the news

You may also like

error: Content is protected !!