के.पी.पाटीलांना विकास कामाच्या परिक्षेत शुन्य मार्क मिळतील – आमदार प्रकाश आबीटकर कासारपुतळे, कासारवाडा, सावर्डे पाटणकर, ढेंगेवाडी येथील प्रचारसभांना उदंड प्रतिसाद – गावोगावी जल्लोषी स्वागत

Spread the news

के.पी.पाटीलांना विकास कामाच्या परिक्षेत शुन्य मार्क मिळतील – आमदार प्रकाश आबीटकर

कासारपुतळे, कासारवाडा, सावर्डे पाटणकर, ढेंगेवाडी येथील प्रचारसभांना उदंड प्रतिसाद – गावोगावी जल्लोषी स्वागत

सरवडे प्रतिनिधी
विकास कामांचे मुल्यमापन लोकांच्या कडून होते त्यामुळे लोकांना दिशाभुल करणारे कोण आहेत ही सुज्ञ जनता जाणुन आहे त्यामुळे के.पी.पाटीलांना विकास कामांत शुन्य मार्क मिळतील असा टोला आमदार प्रकाश आबीटकर यांनी लगावला. ते कासारपुतळे, कासारवाडा, सावर्डे पाटणकर, ढेंगेवाडी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. बिद्रीचे माजी संचालक नंदकुमार सुर्यवंशी, युवक नेते शिवराज खोराटे, अभय पाडळकर, राजेश मोरे आदी प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मारुती सुर्यवंशी होते. येथील सर्व सभांना उदंड प्रतिसाद मिळाला तर गावोगावी जल्लोषी स्वागत करण्यात आले.

आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले की, सातत्याने न्याय देण्याची भुमिका घेवून आपण काम करीत असुन बसुदेव भुजाई योजनेमुळे कासारवाडा कासारपुतळे येथील जमीनी ओलीताखाली येणार असुन हा भाग सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आहे. मागासवर्गीयांच्या ज्या-ज्या मागण्या होत्या त्या पुर्ण करण्याचा प्रयत्न आपण केला असून आपला आशीर्वाद मिळावा. व्यक्तीगत लाभार्थी दीड लाखापर्यंत नेण्याचा आपला प्रयत्न असुन गिरणी कामगारांच्या मागण्या सत्यात उतरवण्यासाठी आपले भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. लोकांच्या हितासाठी केलेला विकास कामांच्या जोरावर आशीर्वाद मागायला आलो आहे. मतदार संघातील जनता ही विकासाला साथ देणारी आहे. निवडणुकीपुरते मतदार संघात फिरणारे के.पी.पाटील यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात मतदार संघासाठी नेमकं कोणतं काम केलं व पुढील पाच वर्षांमध्ये काय व्हिजन घेऊन जाणार आहे हे न सांगता जनतेची दिशाभूल करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे अशा निष्क्रिय उमेदवारास मते देऊन आपले मत वाया घालू नये. गेली दहा वर्ष मतदारसंघ च माझे कुटुंब आहे अशा भावनेने काम केल्यामुळेच तुमच्या सर्वांचे प्रेम मला गावातून मिळत आहे असल्याचे ते म्हणाले.

अभय पाडळकर म्हणाले की, विकास म्हणजे आमदार प्रकाश आबीटकर हे वास्तव चित्र असुन या परिसरातील जनता त्यांना कदापि ही विसरणार नाही. धनगरवाड्यावरील जनतेला नाकारणाऱ्या के.पी.पाटीलांना धनगरवाड्याची मते चालणार काय असा ही सवाल पाडळकर यांनी केले.

यावेळी संभाजीराव आरडे, युवानेते अभिषेक डोंगळे, संजय पाटील, ए.बी.पाटील सर, संदीप मगदूम, शिवाजी चौगले, विलास पाटील, मानसिंग पाटील, एकनाथ वागवेकर, कासारपुतळे येथील सिताराम खाडे, आनंदाने काळे, जयसिंग पाटील, शिवाजी पाटील, सातापा वरोटे, एम. डी. चव्हाण, बाबुराव बसरवाडकर, कासारवाडा (पा) येथील सदाशिव बानगुडे, कृष्णात फराकटे, मधुकर कांबळे, कुमार गाडीवडर, रंगराव पाडळक, रमेश हिरूगडे, लक्ष्मण आकनुरकर, सावर्डे (पा.) बबन पाटील, सरपंच सुमन मोरे, श्रीकांत गुरव उपसरपंच सुरेश परीट ग्रा. प. सदस्य वंदना गुरव संगीता सावंत शितल काशीद आनंदा कांबळे विनोद कांबळे, ढेंगेवाडी येथील बाबासो आदमापुरे, दिलीप आदमापूरे, सागर आत्मापुरे शहाजी भरकाळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो:कासारवाडा, ता.राधानगरी येथील कोपरा सभेमध्ये बोलताना आमदार प्रकाश आबिटकर समोर उपस्थित नागरीक.

चौकट –
पाटीही गेली वाहुन…
के.पीं.च्या आमदार की काळात येथे कोणतीही कामे झाली नाहीत विशेष म्हणजे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केलेल्या एका विकासकामांच्या पाटीवर के.पी.पाटील यांचे नाव होते पण ते निसर्गाला मान्य नसावे त्यामुळे ती के पी पाटील यांची पाटी ही वाहुन गेली असे पाडळकर यांनी सांगितले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!