जिल्हा आढावा बैठकीत शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार* व्ही बी पाटील

Spread the news

*जिल्हा आढावा बैठकीत शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा ठाम निर्धार*

  1. U­

 

व्ही बी पाटील

  •  

कोल्हापूर जिल्हा ग्रामीण व शहर अशी एकत्रित बैठक पार पडली सदर बैठकीला बारा तालुक्याचे अध्यक्ष व त्यांची सर्व कार्यकारणी हजर होती त्याचबरोबर जिल्हा कार्यकारणी जिल्हा महिला कार्यकारणी व शहरातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील होते सदर बैठकीला राजे समरजीतसिंह घाटगे हे प्रमुख उपस्थित होते

बैठकीची सुरुवात जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी केली व एक दिवस राष्ट्रवादी साठी या संकल्पनेचा उद्देश स्पष्ट केला यावेळी

प्रदेश चिटणीस शिवाजी खोत गडहिंग्लज यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना माझी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने कागल व गडहिंग्लज मध्ये विधानसभेला मदत न केल्याबाबत नाराजी व्यक्त केली यावेळी कागल तालुका अध्यक्ष शिवानंद माळी, शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रम जगदाळे, हातकणंगले तालुका अध्यक्ष धनाजी करवते, भुदरगड तालुका अध्यक्ष धनराज चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बी के चव्हाण, करवीर तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, गगनबावडा अध्यक्ष प्रकाश पाटील, रामराजे कुपेकर प्रदेश सचिव अमर चव्हाण, बी के डोंगळे, युवक अध्यक्ष रोहित पाटील, रावसाहेब भिलवडे इत्यादी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

यावेळी बोलताना राजे समरजितसिंह घाटगे यांनी आपण मनापासून राष्ट्रवादीचा स्वीकार केला असून आपण पवार साहेबांच्या बरोबरच राहणार असल्याबाबत ठामपणे सांगितले व जिल्ह्यामध्ये कोणतेही काम असल्यास आपण मला सांगा त्यामध्ये मी सहभाग नोंदवीन असे सांगितले यावेळी आर के पवार यांनी आपण स्थापनेपासून पवार साहेबांच्या बरोबर आहोत आपल्या सर्वांच्या भावना पवार साहेबांना कळवल्या जातील असे सांगून आपण ताकतीने महापालिका निवडणूक लढवण्याविषयी सुचवा केले

यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना जिल्हा अध्यक्ष व्ही बी पाटील यांनी आत्तापर्यंत आपल्या सर्वांची मनोगते ऐकल्यानंतर राज्यांमध्ये ज्या काही चर्चा सुरू आहेत एकत्रित होण्याबाबत परंतु कोल्हापूर जिल्हा पवार साहेबांच्या बरोबर ठाम असेल हे दिसून आले त्यामुळे आपल्या सर्वांच्या भावना या आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घातल्या जातील त्याचबरोबर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका नगरपालिका यांच्या निवडणुका ताकतीने लढवल्या जातील यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून मी कोठेही कमी पडणार नाही असे सांगितले

प्रास्ताविक स्वागत जिल्हा कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी केले व आभार सरचिटणीस सुनील देसाई यांनी मांडले


Spread the news

You may also like

error: Content is protected !!