काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेला मोठे धक्के, अनेकांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश
मिरज
मिरज तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेवर मोठा विश्वास टाकला. पण त्यांची घोर निराशा झाली असे अनेक नाराज कार्यकर्ते सध्या जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करीत आहेत. अनेक जबाबदार नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रवेश झाले. हा फक्त ट्रेलर अजून पिक्चर बाकी आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाचा मोठा धमाका होऊन पिक्चर क्लिअर होईल असा दावा जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिती कदम यांनी केला.
रविवारी सायंकाळी राष्ट्रवादीच्या (शरद पवार) जिल्ला उपाध्यक्ष भोसे गावच्या माजी पंचायत समिती सदस्य अनिता कदम, ग्रामपंचायत सदस्या उज्वलाताई पवार, सोसायटीच्या व्हाईस चेअरमन संगिता खोत, करोलीच्या माधुरी पाटील, शशिकांत माळी, शिवसेनेचे गुलाबराव पाटील सादिक पठाण, अतिक सौदागर, तौफीक शिपाई, समीर पठाण, शहारुख पठाण अशा अनेक कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी, डॉ. महादेव कुरणे, बेडगचे अमर पाटील, सोनीचे अरविंद पाटील, प्रविण घेडे, डॉ. पंकज म्हेत्रे, सलीम पठाण, जयसिंग चव्हाण, बंडू रुर्वकर, सुशिल माळी यांच्यासह जबाबदार पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष कार्याला वाहून घेतले होते. पण राज्यातील सता जाताच, या पक्षाच्या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवली. त्यांना निराधार केले. त्यामुळे असे नाराज कार्यकर्ते जनसुराज्य पक्षातील कामाला आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून प्रवेश करीत आहेत. गेल्या काही दिवसात मिरज तालुक्यातील अनेक मातब्बर नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रवेशकरुन कामाला सुरुवात केली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील शेकडो कार्यकर्ते दररोज पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत, असे समित कदम यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षाकडून निश्चित न्याय दिला जाईल. महिलांचीही मोठी शक्ती जनसुराज्य पक्षाच्या पाठीशी उभी रहात आहेत. त्यांना सक्षम करण्याबरोबर मक्कम आधार देण्याचे काम पक्ष करेल. पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल. आत्तापर्यंत केलेल्या
जबाबदार नेत्यांचे पक्ष प्रवेश
गेल्या काही दिवसात काँग्रेसचे माजी मिरज तालुका प्रमुख अमर पाटील, राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिता कदम, भाजपाचे डॉ. महादेव आण्णा कुरणे अशा अनेक जबाबदार नेत्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे. गेली बरेच वर्षे ही मंडळी आपापल्या पक्षात जबाबदारीने कार्यरत होती. पण त्यांनी पक्षत्याग करुन समित कदम यांचे नेतृत्व मान्य केले आहे. आगामी काळात शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि ग्रामीण भागातील अनेक मातब्बर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कामावर विश्वास ठेवून हे लोक पक्षात दाखल होत असले तरी हा केवळ ट्रेलर आहे. पक्ष प्रवेशाचे अनेक मोठे धमाके आगामी काळात दिसतील. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची चाहूल लागताच सर्वांसमोर पिक्चर क्लिअर होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेत जनसुराज्यची ताकद दिसेल, असा दावाही कदम यांनी केला.