जनतेकडून राजर्षी शाहू महाराजांना त्रिवार अभिवादन

Spread the news

  1. जनतेकडून राजर्षी शाहू महाराजांना त्रिवार अभिवादन

कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराजांच्या १०२ व्या स्मृतीदिनानिमित्त आज सोमवारी टाउन हॉल नर्सरी बागेतील शाहू स्मृतीस्थळांवर शाहू प्रेमी जनतेने अभिवादन केले. दिवसभर जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या शाहू प्रेमींनी अभिवादन केले. शाहू सलोखा मंचाच्यावतीने १०२ सेकंद शांतता पाळून महाराजांना आदराजंली वाहिली. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनेकांनी दर्शन घेतले.

नर्सरी बागेतील राजर्षी शाहू स्मतीस्थळांवर श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगांवकर, मालोजीराजे, मधुरिमाराजे, यश राजे, यशस्विनी राजे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी मान्यवरांसह उपस्थित शाहूप्रेमींनी राजर्षी शाहू महाराजांच्या १०२ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून १०२ सेकंद शांतता पाळून आदराजंली वाहिली. यावेळी राजर्षी शाहू महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष माजी महापौर आर.के. पोवार, शिवसेना सह संपर्क नेते विजय देवणे, आपचे प्रदेश सचिव संदीप देसाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, निवृत्त कॅप्टन शिवाजीराव महाडकर, कॉ. अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, पी.एल. बरगे, मेघा पानसरे, रघू कांबळे, दगडू भास्कर, सदानंद डिगे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, अजय दळवी, उद्योजक तेज घाटगे, मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, सीए अदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, वसीम सरकवास, माजी नगरसेवक तौफीक मुल्लानी, माजी नगरसेविका लिला धुमा, चंदा बेलेकर, राजेंद्र दळवी, नितिन जाधव, शफी मणेर, सुनील देसाई यांच्याह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

१०२ किलो तांदळातून रांगोळी

समाधीस्थळ परिसरात १०२ किलो तांदळातून राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा असलेली भव्य रांगोळी बीडचा कलाकार उद्देश गोवर्धन पघळ यांनी काढली. त्यांच्या रांगोळी शाहू छत्रपतीसह मान्यवरांनी अभिनंदन केले. रांगोळी सकारण्यासाठी उद्देश पघळला १२ तास लागले. शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा प्रसार केला. तसेच शेती आणि शेतकऱ्याला महत्व दिले होते. म्हणून १०२ किलोची तांदळाची रांगोळी काढल्याचे त्याने सांगितले. आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून संदीप बिरांजे, विश्वविक्रम कांबळे यांनी रांगोळीसाठी सहकार्य केले. रांगोळी काढण्यासाठी उद्देशला विजय सगर, विश्वविजय कांबळे, रोहित कांबळे, अजिंक्य घाडगे, रतन सूर्यवंशी यांची मदत झाली.

…………

राहुल रेखावर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वाहिली आदराजंली

राजर्षी शाहू महाराज स्मृती शतक महोत्सवी वर्षाचे आयोजन दोन वर्षापूर्वी तत्कालिन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले. त्यांची कोल्हापूरातून बदली झाली असली तरी आज सोमवारी सकाळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शाहूंना आदराजंली वाहिली. सीए अदित्य बेडेकर यांच्या मोबाईलवर त्यांनी संपर्क साधला होता.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!