आरक्षणाची दुसरी बाजू समजून घेणे गरजेचे : हिंदुराव हुजरे-पाटील
आरक्षण : दुसरी बाजू…! या लघु चित्रपटाचा पहिला प्रीमियर शो हाऊसफुल
कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रासह देशभर गोंधळाचे वातावरण सुरू आहे. समाजात दंगल सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. माणसं जाती-जाती गटागटामध्ये विभागली चालली आहेत. कधीही भडका होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाची दुसरी बाजू ही समजून घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे हिंदुराव हुजरे-पाटील यांनी केले.
ते लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी निर्मिती फिल्म क्लब आणि बालसाहित्य कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी तिसऱ्या राजर्षी राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात आरक्षण : दुसरी बाजू…! या लघु चित्रपटाच्या पहिल्या प्रीमियर शो प्रसंगी बोलत होते. सदर लघू चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.
यावेळी दयानंद लिपारे, रणजित माजगावकर, चंद्रकांत पाटील, शीतल धनवडे, नसीर अत्तार, सुनिल ठाणेकर, बाळासाहेब कोळेकर, राजाराम लोंढे, कृष्णात चौगले, सागर यादव, सतिश घाटगे, संगम कांबळे, अमोल सावंत, दुर्वा दळवी, अभिजीत पाटील यांना निर्मिती विचारमंच, कोल्हापूरच्या वतीने उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षितांच्या समस्या, प्रश्न चव्हाट्यावर मांडून त्या सोडवण्यासाठी पत्रकारितेचा वापर करणाऱ्या धाडसी आणि संवेदनशील माध्यम कर्मींना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
नवोदित कलाकारांना घेऊन नाटक व चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लब निर्मित आरक्षण : दुसरी बाजू…! या बहुचर्चित सध्या गाजत असलेल्या आरक्षण या प्रश्नाला दुसरी बाजूही आहे. ती बाजू कोणती? हा महत्त्वाचा विषय घेऊन तयार झालेल्या मराठी लघु चित्रपटाचा पहिला प्रीमियर शो प्रचंड गर्दीने हाउसफुल झाला.
आपल्या सर्वांचे आदर्श, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी मराठी भाषेतील सर्वात मोठ्या भव्य महानिबंध महास्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले.
यावेळी साहिल नारुलकर, एम. बी. मलमे, चंद्रकांत सुर्यवंशी, संतोष धुरंधर, सुर्यकांत सांगेलकर, संदिप जंगम, आशाताई घुटे, प्रशांत चुयेकर, पी. एस. कांबळे, पी. आर. कांबळे, दिगंबर सकट, नामदेवराव कांबळे, प्रा. अशोक आळतेकर, नितेश उराडे, प्राचार्य बापूसाहेब कांबळे, सिध्दाप्पा धनगर, गणेश काळे यांना राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिवसभर चाललेल्या या लघु चित्रपट महोत्सवांमध्ये स्वागताध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, अनिल म्हमाने, डॉ. नंदकुमार गोंधळी, ॲड. करुणा विमल, दयानंद लिपारे, रणजित माजगावकर, चंद्रकांत पाटील, शीतल धनवडे, प्राचार्य डॉ. सतिश देसाई, प्रा. दादासाहेब ढेरे विश्वासराव तरटे, विद्याधर कांबळे, हंबीरराव तरटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
महोत्सवाचे आयोजन बालसाहित्य कलामंचचे आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, तक्ष उराडे, कनिष्का खोबरे, पृथ्वीराज वायदंडे, स्वरल नामे, पृथ्वीराज बाबर, मंथन जगताप, नामदेव मोरे, अरहंत मिणचेकर, अश्वजित तरटे यांनी केले होते.