*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाद्वारे शासनाच्या योजनांची शिदोरी घरोघरी पोहचवा : राजेश क्षीरसागर यांच्या सूचना*
*दि.१२ पासून घरोघरी जावून शिवसैनिक घेणार शासनाच्या टॉप टेन योजनांचा आढावा*
कोल्हापूर, दि. १० : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन वर्षात जनहिताच्या अनेक योजना राबविल्या आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच शासन आपल्या दारी योजनेतून शासनाच्या योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचविल्या गेल्या. याच पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, महिलांना एस.टी.चे अर्धे तिकीट, जेष्ठांना एस.टी.मोफत प्रवास, अन्नपूर्णा, लाडका भाऊ योजनेतून लाभार्थ्यांना शिशुवृत्ती, वयोश्री, सारथी, बार्टी, आनंदाचा शिधा, शेतकरी कर्जमाफी अशा योजनांची गंगोत्री राज्यात वाहती केली आहे. या योजनांचा लाभ राज्यातील कोट्यावधी नागरिकांना झाला असून, महायुती सरकारच्या कामकाजाबाबत जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे श्री.एकनाथ शिंदे हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत आणि अशा जनकल्याणकारी योजना राबवाव्यात, अशी इच्छा सर्वसामन्यांमधून होत आहे. शासनाच्या या योजनांचा आढावा घेण्यासाठी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाची सुरवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून, या माध्यमातून शासनाच्या योजनांची शिदोरी घरोघरी पोहचवा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केल्या.
मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट अभियाना संदर्भात माहिती देण्याकरिता शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्ह्यातील अभियानास दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी पासून सुरवात करण्यात येणार असून, यामध्ये घरोघरी जावून शिवसैनिक शासनाच्या टॉप टेन योजनांचा आढावा घेणार आहेत. कोणी लाभार्थी वंचित राहिले असतील तर त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने तात्काळ आवश्यक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासह लाभार्थी महिला व नागरिकांशी सुसंवाद साधला जाणार आहे. प्रत्येक पदाधिकारी व शिवसैनिकांनी दररोज १५ ते २० कुटुंबांना भेट देणे आवश्यक आहे. दिलेल्या भेटीचा संक्षिप्त आढावा या अभियानाच्या अॅप्लीकेशनवर अपलोड करावा लागणार आहे. या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्याची सुवर्ण संधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनविण्यासाठी येत्या दहा दिवसात शहरात भगवा झंजावात निर्माण करा, अशा सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, सुनील जाधव, उपजिल्हाप्रमुख दीपक चव्हाण, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, रणजीतhf मंडलिक, राज जा2धव, विनय वाणी, उदय भोसले, राहुल चव्हाण, निलेश हंकारे, प्रभू गायकवाड, रियाज बागवान, अर्जुन आंबी, सचिन भोळे, धनाजी कारंडे, रुपेश इंगवले, कृष्णा लोंढे, विक्रम पवार, टिंकू देशपांडे, मंदार पाटील, सुरेश माने यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.