दक्षिणेत तब्बल 750 कोटीची केली कामे
ऋतुराज पाटील यांची माहिती
कोल्हापूर
गेल्या पाच वर्षात दक्षिण विधानसभा
मतदारसंघात आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकाने केलीत.गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी योजना,गाव तिथे
क्रीडांगण, विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका,ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र या पद्धतीने प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण केलाय अशी माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी
महाविकास आघाडीतून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने दक्षिण विधानसभा मतदार संघातून आमदार ऋतुराज पाटील यांना उमेदवारी जाहीर झालीय. या पार्श्वभूमीवर आज आमदार ऋतुराज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.सुरुवातीचे
अडीच वर्षे राज्यात महविकास् आघाडीची सत्ता असताना आपण
दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणलाय. गेल्या पाच वर्षात दक्षिण विधानसभा मतदारसंघातील समाजातील प्रतेक घटकाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केलाय.14 गावासाठी 344 कोटी रुपयांची गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी योजना आपण मंजूर केलीय.आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
मतदासांघातील 14 गावांसाठी गाव तिथे क्रीडांगण योजना,ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका,
महापालिकेसाठी 10 वातानुकूलित
बसेसाठी आपण निधी उपलब्ध करून दिलाय.याबरोबरच रस्ते, गटर्स अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात अशी माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिलीय.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांनी आपल्याला दक्षिण
विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर केल्याबद्दल आमदार ऋतुराज पाटील यांनी घटक पक्षातील नेत्यांचे आभार मानले. कोल्हापुरात आय टी पार्क होण्याकरिता देखील आपण प्रयत्नशील असून त्यासंदर्भात कार्यवाही सुरू असल्याचं देखील आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी सांगितल. शहराच्या हद्दवाढी बद्दल बोलताना आमदार पाटील यांनी
शहर आणि ग्रामीण दोन्ही भागात राहणाऱ्या लोकांशी समन्वय साधून
निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बोलून दाखवलं.
0000000000000000