आचारसंहिता संपताच मुलीना मोफत शिक्षणाचा जीआर
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
कोल्हापूर
सध्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक सुरू असल्याने त्याची आचारसंहिता आहे, ती संपताच मुलींना मोफत शिक्षण देण्याचा जीआर काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला काही अर्थ नसल्याचा फटकाही त्यांनी विरोधकांना मारला.
राज्यातील सर्व अभ्यासक्रमांना मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा करण्यात आली. पण त्याची अमंलबजावणी होत नसल्याने सरकारवर टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी सांगितले की, मोफत शिक्षणाचा हा सगळा विषय व्यावसायिक अभ्यासक्रमाबाबतचा आहे. अजून त्यांच्या प्रवेशासाठी महिना आहे. पण इतकी वाट पहावी लागणार नाही. आचारसंहिता संपली की जीआर निघेल
Lमराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्ह्णाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी दिलेले आरक्षण आमचे सरकार गेल्यानंतर कोर्टात टिकले नाही. यावेळी मात्र आपण अभ्यास करून दहा टक्के आरक्षण दिले आहे. गेल्या वेळी ज्या चुका झाल्या, त्या चुका सुधारण्यात आल्या आहेत. यामुळे हे आरक्षण नक्की टिकेल. दरम्यान, पन्नास वर्षे शरद पवार राजकारणात सत्तास्थानी व केंद्रबिंदू होते. मग त्यांना मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही असा सवालही त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीतील राज्यातील अपयशाबाबत बोलताना मंत्री पाटील म्ह्णाले, शेतकरी आणि जनतेची दिशाभूल करून, खोटे नरेटिव्ह सेट करून मत मिळवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झाला. पण हे फार काळ चालत नाही.