उद्योगमंत्री उदय सामंत यांची श्री महालक्ष्मी अन्नछत्रास सदिच्छा भेट —

Spread the news

उद्योगमंत्री उदय सामंत यांची श्री महालक्ष्मी अन्नछत्रास सदिच्छा भेट —

 

कोल्हापूर

उद्योगमंत्री  उदय सामंत यांनी श्री महालक्ष्मी अन्नछत्रास भेट दिली. यावेळी त्यांनी अन्नछत्रातील श्री महालक्ष्मीची आरती केली व भोजनप्रसादाचा लाभ घेतला. अन्नछत्राच्या कामकाजाची त्यांनी आवर्जून माहिती घेतली. येथील सुव्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले व भोजनप्रसादाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

 

सर्व कर्मचाऱ्यांची आपुलकीने चौकशी करून जास्तीत जास्त महिलांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.अन्नछत्राच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन सदैव पाठीशी राहण्याची ग्वाही दिली. श्री महालक्ष्मी अन्नछत्रचे संस्थापक अध्यक्ष  राजू मेवेकरी यांनी मंत्री 2 उदय सामंत यांचे स्वागत केले. यावेळी राजू सुगंधी, संजय जोशी, सुनील जोशी, रणजीत सुगंधी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!