भारत महासत्ता होण्यासाठी पुन्हा मोदींच पंतप्रधान हवेत :  समरजितसिंह घाटगे

Spread the news

भारत महासत्ता होण्यासाठी पुन्हा मोदींच पंतप्रधान हवेत :

समरजितसिंह घाटगे

 

गडहिंग्लज :
दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्याच्या कल्याणाच्या योजना ज्या पारदर्शकपणे राबविलेल्या त्यामुळे जगभरात भारताचा नावलौकिक वाढला आहे.आहेत. येत्या काही वर्षांत भारताला महासत्ता बनविण्यासाठी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणे गरजेचे आहे. त्यासाठी महायुतीचे उमेदवार खास.संजय मंडलिक यांना उच्चांकी मतांनी निवडून द्या.
असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. अध्यक्षस्थानी गिजवणे गावचे प्रतिष्ठित नागरिक खातेदार अण्णासाहेब पाटील होते.
महायुतीचे उमेदवार खास.संजयदादा मंडलिक यांच्या प्रचारार्थ गडहिंग्लज, ऐनापूर,अत्याळ,इंचनाळ येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

श्री.घाटगे म्हणाले,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वच बाबतीत जागतिक स्तरावर भारताची मान उंचावलेली आहे.त्यांनी केलेल्या विविध कामांची पोचपावती म्हणून त्यांना अपेक्षित असणारे”अब की बार चारशे पार”चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खास. मंडलिक यांना निवडून देऊया.”
मंडलिक कारखान्याचे संचालक ॲड.विरेंद्र मंडलिक म्हणाले,” खास.संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत या लोकसभा मतदार संघात आठशे कोटींची विकासकामे पूर्ण केली आहेत.विकासकामांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमच्यावर मोठा अन्याय झाला.मात्र महायुतीच्या सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच या मतदारसंघात विकासकामे मार्गी लागली.”

यावेळी विठ्ठल पाटील, प्रतिभाताई पाटील,आशाताई देवर्डे,अनिता चौगुले, भिमराव कोमारे, अभिनंदन पाटील ,अजहर बोझगर, चंद्रकांत सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी राजे बॅंकेचे संचालक रविद्र घोरपडे,संजय संकपाळ, महेश भादवणकर,वैभव ठोंबरे,सागर कुराडे,वामन बिलावर, अजित पाटील,अण्णासाहेब पाटील( खातेदार), ॲड.सुरेश कुराडे,सुर्याजी मोहीते,अमृत पाटील, गणपतराव सुर्यवंशी यांच्यासह भाजपाच्या विविध सेलचे पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

स्वागत तालुकाध्यक्ष प्रितम कापसे यांनी केले.प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी केले तर आभार शहराध्यक्ष सुदर्शन चव्हाण यांनी मानले


Spread the news

You may also like

error: Content is protected !!