कोल्हापूर सीआयडी कार्यालयाचे उद्घाटन

Spread the news

कोल्हापूर सीआयडी कार्यालयाचे उद्घाटन

 

कोल्हापूर

गुन्हे अन्वेषण विभागाने अन्य जिल्ह्यातील दाव्यांची चौकशी करुन दाखल झालेल्या गुन्हयांचा सखोल तपास केला. कोल्हापूर विभागाचे काम खूपच समाधानकारक आहे, असे प्रतिपादन गुन्हे अन्वेषण विभागाचे राज्याचे प्रमुख प्रशांत बुरडे यांनी येथे केले. शनिवार पेठेतील कार्यालयाचे रमणमळा येथील विकासगंगा सदनिका येथे स्थंलातर झाले. या कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते पोलीस पाल्यांचा सत्कार झाला.

सन २००९ मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र पोलिस अधीक्षक कार्यालय निर्माण झाले. विस्तृत तपास, चौकशी, पोलिस कस्टडीत मृत्यू, चौकशी कक्ष, कामकाजाचे रेकॉर्डची जपणूक आदी महत्वाची कामे या विभागाकडे आहेत. १५ वर्षे होऊनही आवश्यक सोयी सुविधांचा अभाव होता. या पार्श्वभूमीवर सीआयडीच्या पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नवीन इमारतीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रविवारी सीआयडीचे राज्याचे प्रमुख प्रशांत बुरडे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उदघाटन झाले. त्यांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळवलेल्या पोलीस पाल्यांचा सत्कार झाला.

विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, म्हाडाचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, भीमराव दुबुले, पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील, वसुधा पवार ,मंजुषा पवार, अरुंधती पवार, सरिता बेमाना, वैशाली इंगवले ,एडवोकेट महाडेश्वर ,हेमंत जाधव ,सुनीता नेर्लेकर, विशाल शिराळकर अजित भीमराव दुबुले, योगेश शिंदे यांच्यासह सीआयडीचे सर्व अधिकारी, निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी स्वागत केले. पोलीस निरीक्षक वर्षा कावडे यांनी आभार मानले.

रमणमळा येथील नवीन गुन्हे अन्वेषण विभागाच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन अन्वेषण विभागाचे राज्याचे प्रमुख प्रशांत बुरडे यांच्या हस्ते फीत कापून रविवारी झाले. उपस्थितात जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, अन्वेषणच्या पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, म्हाडाचे कार्यकारी संचालक अशोक पाटील.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!