निष्क्रिय आमदार ऋतुराज पाटील यांच्या सभेला जेवणाचे आमिष : सौ. शौमिका महाडीक

Spread the news

निष्क्रिय आमदार ऋतुराज पाटील यांच्या सभेला जेवणाचे आमिष : सौ. शौमिका महाडीक

कोल्हापूर :प्रचार सभेसाठी बोलवण्या बरोबरच येणाऱ्या लोकांना जेवणाचे आमिष दाखवून प्रचार सभेला लोकांची गर्दी खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न दक्षिण चे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांना करावा लागला. असे प्रतिपादन सौ शौमिका महाडीक यांनी म्हाडा कॉलनी येथील सभेत केले.

गादीचा मान राखण्यासाठी हातात काठ्या घेऊन झाल्या, गादीचा मान या मुद्द्यावर आपण कसे मान राखणारे आहोत व विरोधक कसे गादीचा अपमान करणारे आहेत याबाबत चे स्टंट ही करून झाले. अर्ज माघारी प्रकरणात हातात काठी घेऊन मान राखायला तयार असणाऱ्या काँग्रेसने गादीचा जो काही जाहीर अपमान केला तो सर्वश्रुत आहेच. असे त्या म्हणाल्या.

गेल्या पाच वर्षांपासून दक्षिण मतदारसंघ ऋतुराज पाटील यांच्याकडे होता. पण त्यांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दक्षिण ची अवस्था अतिशय क्षीण झालेली आहे.

गेल्या पाच वर्षात कोट्यावधी निधीच्या माध्यमातून विकास कामाचे नारळ फोडले गेल्याचे भासवले. पण प्रत्यक्षात विकासाचा पत्ताच नाही. रस्त्यांची अवस्था तर अतिशय दयनीय झालेली आहे. जाहीरनाम्यात लिहिलेल्या कुठल्याच बाबी प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या नाहीत. तरुणांसाठी ४ कोटी निधीतून पाच अभ्यासिका पूर्ण केलेल्याची थाप लोक विसरले नाहीत. आजवर एकाच अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले, तेही विधानसभा तोंडावर असताना. गेल्या कित्येक वर्षांपासून कोल्हापूर दक्षिण आणि उत्तर दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे असूनही कुठलीही ठळक विकास कामे यांना सांगता येत नाहीत. कुणीतरी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यात विद्यमान आमदार अगदी मातब्बर आहेत. त्यांना आलेला निधी विद्यमान सरकारने दिला हे त्यांचे बॅनर आणि त्यावरचे स्कॅम (स्कॅन) कोड सांगतात. पण कामे पूर्ण झाली नाहीत ते खराब रस्ते, तुंबलेल्या गटारी, खंडित झालेला पाणी पुरवठा सांगतोच. त्यामुळे दक्षिण चं वारं फिरलय… हे नक्कीच. आता या विद्यमान आमदारांना प्रचार तरी करावाच लागणार. आता यांच्या विकास कामांची पोलखोल झाली आहे. मग लोकांनी व मतदारांनी सभेसाठी यावं यासाठी नाईलाजानं त्यांना जेवणावळीचे चे आमिष दाखवावे लागत आहे.

या सभेप्रसंगी माजी नगरसेविका रूपाराणी निकम, संग्रामसिंह निकम, माजी नगरसेवक महेश वासुदेव, अर्चना ढेरे, मनिषा कुलकर्णी, रीमा पालनकर, अण्णा घाडगे (काका), स्वप्नील जाधव, रवींद्र शिंदे, विनय राजपूत, तुषार घाणेकर, गणेश कदम यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!