निष्क्रिय आमदार ऋतुराज पाटील यांना दक्षिणची जनता घरी बसवणार* – सौ शौमिका महाडीक यांचा घणघणात

Spread the news

*निष्क्रिय आमदार ऋतुराज पाटील यांना दक्षिणची जनता घरी बसवणार* –
सौ शौमिका महाडीक यांचा घणघणात

गोकुळ शिरगाव –
महायुतीच्या विविध योजनांची आपल्या जाहीरनाम्यात चक्क नक्कल करावी लागणाऱ्या विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांना दक्षिणचे मतदार घरी बसवतील.
ऋतुराज पाटील यांना मोठा पराभव दिसत असल्याचे प्रतिपादन गोकुळ संचालिका सौ शौमिका महाडिक यांनी केले.
गोकुळ शिरगाव येथे महायुतीचे भाजपा उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायतीचे मान्यवर तसेच महिला आणि पदाधिकारी उपस्थित होते. अमल महाडिक यांनीयांनी भाजपाच्या माध्यमातून आणि खासदार फंड तसेच केंद्र – राज्य शासनाच्या विविध योजनांमधून गेली पाच वर्षे पद नसतानाही अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघाच्या विविध गावात कोट्यावधीचा निधी आणून मूलभूत विकासाची कामे केली आहेत, मात्र त्याचा कुठेही डिजिटल बोर्ड लावून गाजावाजा केला नाही सुज्ञ मतदार हे नेमके जाणून आहेत. याच्या उलट विद्यमान आमदार ऋतुराज पाटील आपण न केलेल्या कामाची डिजिटल फलक लावून श्रेय घेत आहेत. गेली पाच वर्ष मतदार संघात संपर्क नसलेल्या ऋतुराज पाटील यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
त्यामुळेच येत्या मतदार २० नोव्हेंबर रोजी कमळ चिन्हावर शिक्का मारून त्यांना पुन्हा एकदा अमल महाडिक यांना आमदार करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला . प्रत्यक्ष मतदानासाठी सर्व कार्यकर्ते प्रचारात जीवाचे रान करीत आहेत मात्र त्यांनी रात्रीही दक्षतेने २४ तास काम करत राहावे, सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर कोणताही विश्वास ठेवू नये.
अधिकाधिक टक्केवारी ने मतदान करून अमल महाडिक यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले .
याप्रसंगी दादा, राजू मानेदादा, चंद्रकांत पंडित (माजी सरपंच), संजय वास्कर
ग्रामपंचायत सदस्य – बाबासो माने, अशोक लांडगे, पोपट नाईक, आदित्य दळवी, तसेच योगेश्वर मछले स्मित पाटील, विजय सुतार, विनायक बागणे, विलास कुंभार, प्रकाश मिटकरी, तानाजी चव्हाण, प्रकाश सूर्यवंशी (लाडकी बहीण योजना समन्वयक) तसेच गोकुळ – शिरगाव परिसरातील नागरिकांची तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!