आई -वडील हे मुलांच्या स्वप्नाचे प्रवेशद्वार : भरत रसाळे
कोल्हापूर : “आई वडील हे मुलांच्या स्वप्नांचे प्रवेशद्वार आहेत त्यामुळे आई-वडिलांनी मुलांची स्वप्नं फुलवण्यासाठी योगदान
द्यावे “असे आवाहन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले . ते समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते . या कार्यक्रमास मान्यवर पाहुणे म्हणून समृद्धी प्रकाशनच्या संचालिका वैशाली आगम , पतसंस्थेचे माजी चेअरमन सूर्यकांत बर्गे , संचालक साताप्पा कासार ,दशरथ कांबळे ,समितीचे शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे ,महिला शहराध्यक्ष चारुलता पाटील , शोभा शिंत्रे , व सारिका पाटील हे होते . कोल्हापुरातील अंबिका हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला .
समृद्धी शैक्षणिक प्रसारक संस्था पाचवडे यांच्यावतीने आयोजित समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी इयत्ता पहिली ते चौथीतील 7000 मुलांची परीक्षा घेण्यात आली होती .त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला होता
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना . भरत रसाळे म्हणाले की ,21 वे शतक हे ज्ञानयुग आहे . या युगामध्ये मुले हीच पालकांची संपत्ती आहे .या संपत्तीचे जतन करून परिपूर्ण विद्यार्थी घडवणे हे पालकांचे कर्तव्य आहे .कारण आई-वडील हेच मुलांच्या स्वप्नांचे पहिले प्रवेशद्वार आहेत .ही स्वप्न फुलविण्यासाठी त्यांनी पूर्ण क्षमतेने योगदान द्यावे व अभ्यासाबरोबरच मुलांच्या आहाराकडेही लक्ष द्यावे ” असे आवाहन त्यांनी पालकांना केले यावेळी साताप्पा कासार यानी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेचे प्रमुख आनंद आगम यांनी केले तर आभार अमर आगम यांनी मांडले . सूत्रसंचालन राहुल कदम यांनी केले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते .
.. ..