*!! आई कृपा करी आम्हावरी……..!!*
*आई तुळजाभवानी माते…… गोरगरिबांचा श्रावणबाळ नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांना सहाव्यांदा आमदार कर……!*
*वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या विधानसभेतील विजयासाठी श्री तुळजाभवानी मातेला साकडं……*
*गोकुळ दूध संघाचे युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ५०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते तुळजापुरात*
*महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी तुळजापुरात घेतले आई श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन…….!*
*तुळजापूर, दि. २६:*
*श्री. क्षेत्र तुळजापूर जिल्हा: धाराशिव येथील आई श्री. तुळजाभवानी माता म्हणजे महाराष्ट्रातील साडेतीन पीठापैकी एक पूर्ण शक्तिपीठ. सबंध महाराष्ट्राची कुलदेवता श्री. तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादानेच हिंदवी स्वराज्याची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. महाराष्ट्रासह संबंध भारतवर्षाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले महान तीर्थक्षेत्र.*
*आई तुळजाभवानी माते…… गोरगरिबांचा श्रावणबाळ नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांना सहाव्यांदा आमदार कर……! वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या विधानसभेतील विजयासाठी श्री तुळजाभवानी मातेला साकडं घातले. गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ५०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते तुळजापुरात पोहोचले आहेत.*
*महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी तुळजापुरात आई श्री. तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. आज शुक्रवार दि. २६ रोजी दुपारी एक वाजता वाजता मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आई श्री. तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेतले.*
*मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या समवेत गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील -बापू, गोकुळ दूध संघाची माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील -आबाजी, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, कागलचे माजी नगराध्यक्ष नवल बोते, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळातील प्रा. किसनराव चौगुले, नंदकुमार ढेंगे, बाळासाहेब खाडे, अभिजीत तायशेट्टी, नेताजीराव मोरे, बाळासाहेब तुरंबे, दत्ता पाटील, नारायण पाटील, सुरेश बोभाटे, भगवान बुजरे, पारीसा जंगटे, बबन खोडवे, रणजीत कांबळे, युवराज पाटील, अरुण मुदाण्णा, संजय चितारी, सौरभ पाटील, विकास पाटील, प्रल्हाद गायकवाड, तातोबा चव्हाण, रणजीत बन्ने, प्रकाश वाडकर आदी प्रमुखांसह ५०० हून अधिक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*
*!!धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता…..!!*
*!!भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता……!!*
=============