सोहम चित्रपट प्रदर्शित, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

Spread the news

सोहम चित्रपट प्रदर्शित, प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

कोल्हापूर, प्रतिनिधी

सिद्धगरी मठ कणेरी मठाधिपती प.पू.अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांचे सामाजिक, आध्यात्मिक, शेती शिक्षण, आरोग्य यासंदर्भात केलेले कार्य, कणेरी मठाची माहिती महत्त्व यावर निर्मिती केलेल्या सोहम चित्रपटाला कोल्हापूर सह राज्यभरात पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

कणेरी मठाला अतिशय जुना इतिहास आहे काठावर गेल्या काही वर्षात विविध क्षेत्रात अतिशय चांगले काम सुरू आहे याच कामाचा कामाची माहिती समाजाला व्हावी म्हणून निर्माते संजय भैरे यांनी सोहम चित्रपट निर्माण केला निर्मिती केली आहे. या चित्रपटात मठाधिपती
काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनीही भूमिका केली आहे.

कोल्हापुरात हा चित्रपट प्रभात चित्रपट गृहात प्रदर्शीत झाला. चित्रपट पाहण्यासाठी
लोकांची प्रचंड गर्दी झाली.
सदर चित्रपट महाराष्ट्र कर्नाटक गोवा मिळून ३०चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे सर्वत्र त्याला प्रेक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!