Spread the news

‘होमेसाकॉन २०२५’ होमिओपॅथी परिषद रविवारी

  1. U­

 


कोल्हापूर : पेक्टस होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा) कोल्हापूर यांच्या वतीने रविवार दि. १६ मार्च २०२५ रोजी ‘होमेसाकॉन २०२५’ परिषद आयोजित केली आहे. या परिषदेचे औपचारिक उद्घाटन खासदार मा. धनंजय महाडीक यांच्या शुभहस्ते सकाळी ९.३० वाजता होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय, ताराराणी चौकच्या सभागृहामध्ये होणार आहे.
“होमिओपॅथीद्वारे माझे आरोग्य, माझा हक्क’ अशी परिषदेची संकल्पना असून होमिओपॅथिक औषधोपचारामध्ये होणारे नवनवीन बदल होमपॅथसना आत्मसात करणे अपरिहार्य असते. यास्तव परिषदेचे आयोजन दरवर्षी करणेत येते. अशी माहिती होमेसा प्रसिडेंट डॉ. राजकुमार पाटील यांनी दिली.
दिवसभर चालणाऱ्या या परिषदेमध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे सदस्य डॉ. मंगेश जतकर “भारतीय आरोग्य सेवेमध्ये होमिओपॅथीचा प्रभावी वापर”, “मानसिक आरोग्यासाठी होमिओपॅथी” डॉ. राहुल जोशी, (मुंबई), “राष्ट्रीय वैद्यकिय व्यवसाय पूर्व परिक्षा” डॉ. रोझारिओ डिसूजा (बेळगाव) तर डॉ. प्रशांत तांबोळी (मुंबई) “होमिओपॅथीचा संशोधन व विकास” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय डॉ. संतोष रानडे, डॉ. मंदार कुंटे, डॉ. मनौती तळवळकर आदिंची व्याख्याने होणार आहेत. परिषदेषस ऑफलाईन व ऑनलाईन होमिओपॅथस सहभागी होणार असून सहभागांसाठी सचिव डॉ. राजेश कागले व संयोजक सचिव डॉ. सुनेत्रा शिराळे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन होमेसा तर्फे करणेत येत आहे. पत्रकार परिषदेस डॉ. हिम्मत पाटील, डॉ. सुहास पाटील, डॉ. मिलींद गायकवाड, डॉ. अन्वर गंजेली, डॉ. शितल पाटील, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. अजय हनमाने, डॉ. सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

  •  


Spread the news

You may also like

error: Content is protected !!