हिरकणी मंच तर्फे विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा सन्मान*

Spread the news

*हिरकणी मंच तर्फे विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा सन्मान*
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये हिरकणी मंचच्यावतीने वर्षभर विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सांगितले की, महिलांना आपल्या संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे. जिथे महिलांचा सन्मान होतो तिथे प्रगती निश्चित असते. संयम, कणखरपणा आणि सहनशीलता या गुणांची देणगी सोबत असताना मुलींनी आता धाडसी व्हावे.
हिरकणी मंचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देण्याबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी यापुढेही सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी वर्षभरामध्ये घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धा तसेच पाककला स्पर्धा मधील विजेत्या विद्यार्थिनींना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक हिरकणी मंच समन्वयक प्रा. नीलम रणदिवे यांनी केले यावेळी प्रा. अर्चना जोशी,प्रा. एस.ए.टोणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, डॉ. पी. के.शिंदे, प्रा. शीतल साळोखे, प्रा.एस.बी.शिंदे, दीपाली पाटील, शोभा साठे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

  1. U­

 



Spread the news

You may also like

error: Content is protected !!