श्री जोतिबा विकास प्राधिकरण अंतर्गत आराखड्या बाबत उच्चस्तरीय सचिव समितीची बैठक

Spread the news

 

  1. U­

 

 

  •  

कोल्हापूर

श्री जोतिबा विकास प्राधिकरण अंतर्गत आराखड्या बाबत उच्चस्तरीय सचिव समितीची बैठक आज रोजी मुंबई येथे मंत्रालय मध्ये मा. अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या दालना मध्ये पार पडली. सदर बैठकीमध्ये मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. सदर आराखड्यामध्ये श्री. ज्योतिबा मंदिर तसेच श्री यमाई मंदिराचे संवर्धनाचे काम, जोतिबा डोंगरावरील चव्हाण तळे. कर्पूरेश्वर तळे, नव तळे परिसर आवश्यक सुधारणा, 5 ठिकाणचे पार्किंग परिसर सुधारणा तसेच त्याठिकाणी आवश्यक पिण्याचे पाणी स्वच्छतागृह व इतर सुविधा, डोंगरावर येणाऱ्या जुन्या पायवाटांचे संवर्धन व सुशोभीकरण त्याठिकाणी आवश्यक स्वच्छतागृहे, केदार विजय गार्डन, डोंगर कड्याचे संवर्धन करिता वृक्षारोपण तसेच मजबुतीकरण, दोन ठिकाणी ज्योत स्तंभ त्यामध्ये सांस्कृतिक हॉल, कम्युनिटी किचन व भाविकांच्या साठी सुविधा केंद्र करणेत येणार आहे. यमाई मंदिराकडील चाफेवन परिसर सुधारणा, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी कामांचा समावेश आहे. सदर आराखड्याची एकूण किंमत ही सुमारे रु. 270 कोटी इतकी आहे. सदर आराखडा करताना तिरुमला तिरुपती देवस्थानचा अभ्यास करून त्या धर्तीवर विकास करावा अशा सूचना दिल्या, सदर आराखड्यास उच्चस्तरीय समितीने मंजुरी दिली असून, सदर आराखडा पुढील मंजुरी करिता उच्चाधिकार समिती कडे पाठवणे येणार आहे.
सदर बैठकीस एस कार्तिकेयन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, शिवराज नाईकवाडे सचिव देवस्थान समिती, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक संजय कदम, सागर गवते विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण, एस आर आयरेकर कार्यकारी अभियंता, सा. बां. कोल्हापूर, सचिन कुंभार उप अभियंता सा. बां. कोल्हापूर, सुयश पाटील उप अभियंता देवस्थान समिती, विवेक चव्हाण सहायक अभियंता सा. बां. कोल्हापूर, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, तसेच आर्किटेक्ट संतोष रामाणे हे उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!