व्हाईट आर्मीच्या वतीने विशाळगड दुर्घटनाग्रस्थान वैद्यकीय अन्नधान्य कपडे स्वरूपात मदत

Spread the news

व्हाईट आर्मीच्या वतीने विशाळगड दुर्घटनाग्रस्थान वैद्यकीय अन्नधान्य कपडे स्वरूपात मदत

कोल्हापूर

गेले पंचवीस वर्ष कोणतीही आपत्ती असो मानव निर्मिती व निसर्ग जाळपोळ कर्फ्यू सैन्य भरती अशा आपत्तीजन्य परिस्थिती त संपूर्ण भारतात व भारताबाहेर माणुसकी दाखवण्याचे काम अखंडपणे सुरू आहे लहान मुले त्याचबरोबर वयोवृद्ध माता या अशा प्रसंगात बळी पडतात या लोकांना पुन्हा समाजात उभे करण्यासाठी त्यांच्या पाठीशी मदतीने खंबीरपणे उभे राहण्यासाठी व्हाईट आर्मी अनेक प्रसंगांमध्ये आपले माणुसकीचे योगदान दिले आहे

विशाळगड अतिक्रमण मुक्त मोहिमेवेळी झालेल्या नुकसानीत जवळपास 41 कुटुंबे उघड्यावर आले त्यांच्या मदतीसाठी कोल्हापूर येथील व्हाईट आर्मी धावून गेली आहे. गेले चार दिवसापासून व्हाईट आर्मीच्या वतीने नुकसानग्रस्त लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करून त्यांना त्यांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशीपासून अन्नछत्र उभारून दुर्घटनाग्रस्त झालेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना सकाळ संध्याकाळ जेवणाची सोय गेले तीन दिवस करत असून आज प्राथमिक स्वरूपात लागणारे धान्य भांडी व ब्लॅंकेट चादर अत्यंत आवश्यक वस्तू प्रत्येक घरपोच करण्यात आले. त्याचबरोबर गेले चार दिवस दहशती व तणावाखाली असलेले सर्व परिवार यात लहान मुले वयोवृद्ध महिला, पुरुष घरातील सर्व लोकना वैद्यकीय सुविधा व्हाईट आर्मी डॉक्टरांमर्फत आज देण्यात आली. मुसलमानवाडी गडकरीवाडी, प्रभुळकरवाडी, त्याचबरोबर विशाळगडावरील जवळपास सव्वाशे लोकांना सर्दी ताप, खोकला, अशक्तपणा, डोकेदुखी यावर औषध देण्यात आले डॉक्टर पथकाचे प्रमुख डॉक्टर नंदकुमार जाधव दोन दिवस गडावर थांबून उपचार करत आहेत या उपक्रमासाठी या मदत कार्यासाठी साहित्य व धान्य यासाठी आमदार ऋतुराज पाटील, उज्वल नागेशकर, संजय नरसिंघानी शाहूवाडी चे प्रांत समीर शिंगटे गजापूर येथील माजी सरपंच व आदर्श शाळेचे संस्थापक संजय सिंग पाटील इमाम गनी, प्रभुळकर दिलावर उमरखान, मालदार यांनी विशेष सहकार्य केले.
व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मदत वाटप पथक डॉक्टरांचे पथक त्याचबरोबर प्रशांत शेंडे, हनुमंत कुलकर्णी, विजय भोसले, कस्तुरी रोकडे,आदित्य सणगरे, श्रीकांत पाटील, शैलेश रावण, गजापूर परिसरात मदत करत आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!