मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार – राजेश क्षीरसागर : लोकांचा प्रतिसाद पाहता मला विजयाची खात्री

Spread the news

मतदार बंधू-भगिनींचे मनापासून आभार

– राजेश क्षीरसागर : लोकांचा प्रतिसाद पाहता मला विजयाची खात्री

कोल्हापूर, दि. 20 :
कोल्हापूर उत्तर मधील समस्त मतदारांचा मी शतशः आभारी आहे. महायुती सरकारने विविध योजना सुरू करून सर्व घटकांना न्याय दिल्याने सर्वच मतदार मतदानासाठी उत्स्फूर्तपणे बाहेर पडले. मतदानासाठी जनतेचा प्रतिसाद पाहून मला विजयाची खात्री असल्याचे कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या रणधुमाळीत मला साथ देणाऱ्या आणि माझ्या प्रचार कार्यक्रमांना उपस्थिती लावून माझे मनोबल वाढवणाऱ्या माझ्या मतदारसंघातील सर्व मतदार, पत्रकार बंधू-भगिनींचे, महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो, असे ते म्हणाले.
आज मतदानदिवशी मी मतदारसंघातील मतदान केंद्रांवर भेट दिली. यावेळी नागरिकांचा आणि खास करून लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मला विजयाची खात्री झाल्याचे क्षीरसागर म्हणाले. आगामी काळात कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि कोल्हापूर शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!