प्रकाश आबिटकर यांच्या विजयाची हॅट्रीककरा, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

Spread the news

  • राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा येण्यासाठी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात प्रकाश आबिटकर यांच्या विजयाची हॅट्रीककरा, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह शेतकर्‍यांना वीज माफीच्या निर्णयाबरोबरच अन्य महत्वाच्या निर्णयांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. त्यामुळे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील प्रकाश आबिटकर यांची हॅट्रीकसाधावी, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
गेल्या आठवड्यात राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. त्यामुळे सर्वच पक्षात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर करण्याबरोबरच प्रचाराचे सूक्ष्म नियोजन आणि महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी मोर्चे बांधणी करण्यात आघाडी घेतलीय. कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवण्यात आलीय. त्यामुळे खासदार महाडिक यांनी सुद्धा आपली यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारासाठी खासदार महाडिक यांनी भाजप कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत खासदार महाडिक यांनी कार्यकर्ते पदाधिकार्‍यांची मन की बात जाणून घेतली. त्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर विविध समित्या आणि पक्ष कार्यकर्त्यांना प्राधान्याने संधी द्यावी यासह विविध अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. खासदार महाडिक आणि सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते प्रकाश आबिटकर यांचे पक्ष कार्यालयात स्वागत करण्यात आले. दरम्यान २८ ऑटोबर रोजी आपण भाजपच्या सहकार्याने जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं आबिटकर यांनी जाहीर केले. विजयाची हॅट्रिक साधल्यानंतर पक्ष कार्यकर्त्याला प्रत्येक स्तरावर मोठा भाऊ या नात्याने सन्मानाची वागणूक देऊ. जिल्हास्तरीय विविध समित्यावर पक्ष कार्यकर्त्यांना मानाचं पद दिली जातील, असंही आबिटकर यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्राध्यापक जयंत पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!