*वीरशैव समाजाच्या जडणघडणीत मल्लिकार्जुन महास्वामिंचे मोलाचे योगदान – किरण सांगावकर*
*वीरशैव समजतर्फे गुरुपौर्णिमा व महास्वामिंचा स्मृतिदिन संयुक्तपणे साजरा*
कोल्हापूर – वीरशैव समाजाच्या जडणघडणीत ज्ञानयोगाश्रम विजापूरचे मल्लिकार्जुन महास्वामी यांचे योगदान निश्चितच मोलाचे असून, मानव धर्म हाच श्रेष्ठ धर्म असल्याचे त्यांचे विचार आजच्या काळात फारच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष किरण प्रकाश सांगावकर यांनी रविवारी (ता. 21 जुलै) येथे केले.
वीरशैव लिंगायत समाजातर्फे गुरुपौर्णिमा व मल्लिकार्जुन महास्वामी स्मृतिदिन सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अक्कमहादेवी मंडपात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष राजू वाली हे होते.
सांगावकर म्हणाले, वीरशैव विद्यार्थी वसतिगृह व अक्कमहादेवी मंडप या दोन वास्तू उभरण्यामध्ये मल्लिकार्जुन महास्वामिंचा सिंहाचा वाटा असून सत्पुरुषाचे विचार आचरणात आणणे व गुरूंची आज्ञा पाळणे यामुळेच मनुष्य जीवन सुखमय होण्यास मदत होते.
याप्रसंगी किरण सांगावकर व राजू वाली यांच्या हस्ते महास्वामींच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी विविध धार्मिक विधी , आरती व प्रसाद वाटप झाले.
ज्येष्ठ संचालक चंद्रकांत स्वामी , कुमार हिरेमठ , राहुल नष्टे, प्रमोद व्हणगुत्ते, अविनाश नशिपुडे, राजेंद्र करंबळी, संजय बोधले , धनंजय स्वामी , प्रशांत करंबळी, अरुण चोपडे, बी.एस.पाटील आदी उपस्थित होते.
संचालक राजेश पाटील चंदूरकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष मनोहर गाडवे यांनी आभार मानले.