पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची अकिवाट येथे दुर्घटनास्थळाला भेट* *पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडून मृताच्या कुटुंबीयांना चार लाखांची तात्काळ मदत जाहीर*

Spread the news

*पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांची अकिवाट येथे दुर्घटनास्थळाला भेट*

*पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडून मृताच्या कुटुंबीयांना चार लाखांची तात्काळ मदत जाहीर*

*मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करणार*

*अकिवाट, दि. २:*
अकिवाट ता. शिरोळ येथे महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून सातजण वाहून गेल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यापैकी एक जणाचा बुडून मृत्यू झाला, दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत. चौघेजण पोहून बाहेर आले.

या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दुपारी दोनच्या सुमाराला तातडीने अकिवाट ता. शिरोळ येथे भेट दिली. दत्तवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्घटनेतील मृत सुहास पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच; दुर्घटनेतून वाचलेल्या इतर जखमींची विचारपूस केली.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना तात्काळ चार लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली. मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करणार, असल्याचेही ते म्हणाले.

मंत्री श्री. मुश्रीफ यांनी एनडीआरएफच्या जवानांकडून शोध व मदत कार्याची माहिती घेतली. केंद्रीय एनडीआरएफ पथकासह महाराष्ट्राचे एसडीआरएफ व कर्नाटकच्या एसडीआरएफच्या सात बोटी शोध कार्यात सहभागी झाल्या आहेत.

मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमवेत खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जयसिंगपूर चे माजी नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे, अशोकराव माने, विजय भोजे आदींसह अधिकारी उपस्थित होते.
=============


Spread the news

You may also like

error: Content is protected !!