*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिमेला पुष्पहार घालून वाहिली आदरांजली*
*कोल्हापूर, दि. ९:*
*कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र व कर्तबगार माजी मंत्री स्वर्गीय कै. दिग्विजयजी खानविलकर यांची आज १२ वी पुण्यतिथी….! त्यानिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.*
*यावेळी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सी. पी. आर. ही गोरगरिबांच्या वैद्यकीय सुविधेची जननी आहे. कोल्हापूरचे सुपुत्र स्वर्गीय कै. दिग्विजयजी खानविलकरसाहेब यांनी आरोग्य मंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाला खऱ्या अर्थाने उर्जितावस्था आणली. हृदयरोग उपचारांसारखा अत्यंत महत्त्वाचा विभाग सुरू करून या रुग्णालयात त्यांनी अनेक सेवा- सुविधा आणल्या. वीस वर्षांपूर्वी त्यांच्या प्रयत्नातूनच कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयही मंजूर आणि कार्यरतही झाले.*
*यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनिता सैबनावर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ. सरीता थोरात, डाॅ. शिशिर मिरगुंडे, डॉ. सुधीर सरवदे, बंटी सावंत, डॉ. गिरीश कांबळे, डाॅ. रणजीत जाधव आदींसह डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी व रूग्ण उपस्थित होते.*
………
*कोल्हापूर- महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री स्वर्गीय कै. दिग्विजयजी खानविलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आदरांजली वाहिली.*
==========