*स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना नवव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन*
*विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेतकऱ्यांची दिवसभर रीघ*
कागल, प्रतिनिधी.
शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे याना त्यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले. तत्पूर्वी कारखाना प्रांगणातील मुख्य कार्यालयासमोरील स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्याचे पूजन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचे हस्ते केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व कागल संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या प्रतिमेचेही पूजन केले.
दिवसभरात स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, कृषी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरानी तसेच शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील,सर्व संचालक ,संचालिका कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,राजे बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील,बिद्रीचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, भूषण पाटील ,श्रीनाथ समुहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी
शाहू ग्रूपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी,सभासद, शेतकरी ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानीही केले अभिवादन .*
मंडलिक साखर कारखान्याचे चेअरमन, खा. प्रा. संजय मंडलिक,श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, वीरेंद्र मंडलिक, उद्योजक तेज घाटगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्व.घाटगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.