- शाहू महाराजांकडून शिवाजी महाराजांसह महापुरुषांना अभिवादन
कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीमंत शाहू छत्रपती यांनी शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांच्या समवेत महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणूकीसाठी गुरुवारी (२१) रात्री शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली. शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांसह शहरातील महापुरुषांच्या अभिवादन केले.
न्यू पॅलेस येथून मोटर सायकल रॅलीद्वारे कार्यकर्ते शिवाजी चौकात आले .यावेळी शाहू महाराजांनी शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. कार्यकर्त्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘ जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या.
त्यानंतर शाहू महाराजांनी बिंदू चौकातील महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. लक्ष्मीपुरीतील आईसाहेब महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला नमन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा जयघोष केला . दसरा चौकातून व्हिनस टॉकीज येथील छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा, कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला शाहू महाराजांनी अभिवादन केले. तसेच टाऊन हॉल जवळील नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिर महाराणी ताराराणी यांचे मंदिर आणि राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन शाहू महाराजांनी अभिवादन केले.
यावेळी शहाजीराजे, माजी नगरसेवक माणिक मंडलीक, विक्रम जरग, अर्जुन माने, ईश्वर परमार, राजाराम गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.