*राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०२ व्या पुण्यतिथीनिमित्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिवादन…..*
*कोल्हापूर, दि.६:*
*राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळेच कोल्हापूरची ओळख आणि लौकिक सबंध जगभर पोहोचलेला आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
*कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर यांच्या १०२ व्या पुण्यतिथीनिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समतेचा विचार दिला. आरक्षणाचा कायदा, सक्तीचे प्राथमिक शिक्षण करणारे दूरदृष्टीचे लोककल्याणकारी राजे होते. त्यांनी कोल्हापुरात स्थापन केलेल्या सर्वधर्मीयांच्या वस्तीगृहांवरूनच त्यांची सर्वधर्मीयांबद्दलची भावना प्रतिबिंबित होते. त्यांनी कृषी क्षेत्रासह उद्योगाला, कला -संस्कृतीला व क्रीडा क्षेत्राला सातत्याने चालना दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदिल फरास, संतोष धुमाळ, रफिक शेख, बळवंत कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
=============