अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धा संपन्न…
कोल्हापूर, ता.१८: अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या वतीने सालाबादप्रमाणे याहीवर्षी झिम्मा-फुगडी सांस्कृतिक स्पर्धा घोटवडे ता.राधानगरी येथे मोठ्या उत्साहात नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेसाठी राधानगरी तालुक्यातील हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा होणे गरजेचे आहे. अभिषेक डोंगळे यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून त्यांचे समाजकारण चांगले आहे. अभिषेक डोंगळे युवाशक्तीच्या माध्यमातून नेहमीच गरजवंतांना आधार देण्याचं काम केलं जाते असल्याचे गोरौद्गार श्रीमती रेडेकर यांनी या प्रसंगी काढले.
यावेळी बोलताना अभिषेक डोंगळे म्हणाले कि, डोंगळे परिवाराची समाजकार्याची परंपरा यशस्वीरित्या माझ्या हातून पुढे चालविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असून युवाशक्तीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्यासाठी अविरत काम सुरु असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी युवाशक्तीचे अध्यक्ष सुहास डोंगळे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात युवाशक्तीच्या कामाचा आढावा घेवून भविष्यात आणखीन जोमाने युवाशक्ती समाजकार्य करेल आणि आपण महिला माता भगिनीं यांनी तुमचा हक्काचा माणूस म्हणून अभिषेक डोंगळे यांना पाठबळ देण्याचे आवाहन केले. यावेळी राजश्री डोंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार देवबा पाटील व सूत्रसंचालन प्रा.एम. पी.पाटील यांनी केले.
यावेळी श्रीमती अंजना रेडेकर संचालिका गोकुळ दूध संघ, धिरज डोंगळे, अभिषेक डोंगळे, वंदना चौगले, कल्पना मोरे, आरती तायशेटे, अमृता डोंगळे, भाग्यश्री डोंगळे, राजश्री डोंगळे, चैत्राली डोंगळे, दीपाली पाटील, मनीषा किरुळकर, सरीता पौडकर, अमृता चौगले, राजू चौगले, मुकुंद पाटील, शिवाजी डोंगळे, संग्राम मगदूम, सुहास डोंगळे, उदय पाटील, पवन गुरव व युवाशक्ती पदाधिकारी तसेच या कार्यक्रमावेळी पंचक्रोशीतील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
स्पर्धेतील विजेते
झिम्मा स्पर्धा
प्रथम – कालिका कासारवाडी, द्वितीय- सखी वाळवे खुर्द, तृतीय – धनलक्ष्मी पंडेवाडी
उत्तेजनार्थ – नागनाथ सोनाळी व गौरीशंकर नेवाचीवाडी.
फुगडी स्पर्धा
प्रथम- अश्विनी पाटील /पूजा माळवी, द्वितीय -जयश्री कांबळे /सारिका पाटील, तृतीय – चंद्रभागा पाटील/पल्लवी पाटील, उत्तेजनार्थ – विमल पाटील/दीपाली पाटील व अनिता कळप / अंजना कुसाळे.
सुप नाचवणे स्पर्धा
प्रथम- दयाराणी कुदळे, द्वितीय -पौर्णिमा सूर्यवंशी, तृतीय – रविना सुतार
उत्तेजनार्थ – प्रिया साळवी व लक्ष्मी सुतार.
घागर घुमवणे स्पर्धा
प्रथम- किरण येरुडकर, द्वितीय – उज्वला पाटील, तृतीय -सरीता डोंगळे
उत्तेजनार्थ – रुपाली बसरवाडकर व विद्या पाटील.
——————————————————————————————————-