*भगवान महावीरांचे 2550 वे निर्वाण वर्ष महाराष्ट्र सरकार विविध उपक्रमांनी साजरे करणार.*
——————————
*मंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखालील शासकीय समितीत ललित गांधी यांचा समावेश*
——————————
मुंबई : संपूर्ण विश्वाला शांति,अहिंसा व अपरिग्रहाचा संदेश देणारे 24 वें जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाण कल्याणक दिनाला 2550 वर्ष पुर्ण होत आहेत.महाराष्ट्र सरकार हे वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करणार आहे
या वर्षभरात भगवान महावीरांचे विचार व कार्य अधिकाधिक लोकांपर्यत पोहचावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे कौशल्य विकास मंत्री नाम. मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समिती स्थापन केली असुन “अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघाचे” राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचाही या समितित अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
शिक्षण संचालक (माध्यमिक), सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक या शासकीय सदस्यांबरोबरच माजी आमदार चैनसुख संचेती, पवन सिंघवी, हितेश मोता, सुरेंद्र शहा, नितीन वोरा, डॉ. के.एस. गंगवाल यांचा या समितित समावेश करण्यात आला आहे.
भगवान महावीरांच्या 2550 व्या निर्वाण वर्षानिमित्त आयोजित करावयाचे सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांसाठी राज्यभर निबंध स्पर्धांचे आयोजन हे या समितीचे मुख्य विषय असतील अशी माहिती ललित गांधी यांनी दिली.
वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुका स्तरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम व गाव स्तरापर्यंत निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातील असेही ललित गांधी यांनी सांगितले.