शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 175 कोटींच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेजही सुरु होणार

Spread the news

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील

           – उच्च  तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

  • शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 175 कोटींच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन
  • रोबोटिक्सइंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन
  • पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेजही सुरु होणार

 

कोल्हापूर  : भारतामध्ये 2020 साली नवे शैक्षणिक धोरण आलेदेशात महाराष्ट्र राज्य नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहेएकत्रित शिक्षण पद्धतीमुळे आणि संयुक्त विद्यापीठ सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय एकत्रित शिकता येणार असून आता अष्टपैलू विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन उच्च  तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन  शासकीय तंत्रनिकेतन येथील रोबोटिक्सइंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होतेते म्हणालेमुलांना चांगले शिक्षण मिळाले नाही तर बेरोजगारी वाढेलमहाविद्यालयात वेगवेगळी तांत्रिक उपकरणेमॉडेल सादर करून प्रदर्शने भरवायासाठी सीएसआरची मदत घ्याजगभरातून वेगवेगळे शिक्षक बोलवाचांगले क्रीडा स्पर्धांचे आयोजन करा यातून चांगले शैक्षणिक वातावरण तयार होवून मुलांना जगाच्या पाठीवर उभे राहण्यासाठी आधुनिक शिक्षण मिळेल.

 

या उद्घाटन व भूमीपूजन कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, अधिक्षक अभियंता तुषार बुरूड, सहसंचालक दत्तात्रय जाधव, उपसचिव मोहम्मद उस्मानी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.नितीन सोनजे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!