गोशिमा पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध आठ नव्या संचालकांना संधी 

Spread the news

गोशिमा पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

आठ नव्या संचालकांना संधी

कोल्हापूर

 

जिल्हयातील व गोकुळ शिरगांव वसाहतीमधील उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( गोशिमा) ची सन २०२४ ते २०२९ करीता कार्यकारी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई ,सचिन शिरगांवकर,
राजीव परीख,.दिपक चोरगे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक सुरळीत पार पडली.

 

गोशिमाचे विद्यमान अध्यक्ष .नितीनचंद्र दळवाई यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
गोशिमा संस्थेच्या सध्या असलेल्या कार्यकारी संचालक मंडळातील सात संचालक कमी होउन त्या जागी नवीन आठ त तरुणांना संधी देण्यात आली.

बिनविरोध निवड झालेल्या कार्यकारीणी सदस्य संचालकां मध्ये. दिपक चोरगे, स्वरूप कदम, सुनील शेळके, संजय देशिंगे, रणजीत पाटील, मंगेश पाटील, अमोल यादव, नचिकेत कुंभोजकर, राजवर्धन जगदाळे, बंडोपंत यादव, सत्यजित जाधव, अनिरुद्ध तगारे, रणजीत मोरे, रामचंद्र दुंडाप्पा लोहार, व्ही.आर.जगताप यांचा समावेश आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!