- गोकुळने दिली गोड बातमी
दुध खरेदी दरात दीड रूपये वाढ
अरूण डोंगळे यांची माहिती
“
कोल्हापूर
गोकुळ दूध संघाने दुध उत्पादक शेतकऱ्यांना गोड बातमी दिली आहे. संघाच्या कार्यक्षेत्राबाहेरील सांगली, सोलापूर व सीमा भागातील गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रूपयांची वाढ करण्याचा निर्णय संघाने घेतला असल्याची माहिती संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांनी दिली आहे. यामुळे या भागातील दूध खरेदी दर प्रतिलिटर तीस रूपये झाला आहे.
सध्या दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या प्रमाणात मागणी कमी आहे. त्यामुळे या दुधापासून पावडर व बटर तयार करण्यात येत आहे. त्याचेही दर जागतिक बाजारपेठेत कमी झाल्याने दूध दरात कपात केली होती. अशा काळात सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर पाच रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संघांनी किमान तीस रूपये दर देणे बंधनकारक केले.
सध्या गोकुळच्या वतीने कार्यक्षेत्रातील दुध उत्पादकांना ३३ रूपये दर देते. पण कार्यक्षेत्राबाहेर हा दर २८.५० पैसे होता. यामुळे सरकारच्या अनुदानापासून हा शेतकरी वंचित राहू नये यासाठी हा दर तीस रूपये करण्याचा निर्णय गोकुळने घेतला असल्याचे डोंगळे यांनी सांगितले.या दराची अमंलबजावणी तातडीने सुरू करण्यात आली आहे.