- *गोकुळ दूध संघाच्या म्हैस दूध संकलन वाढीचा संकल्प करूया……!*
*वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन*
*बामणी येथे दूध संघाच्या संपर्क सभेला दूध संस्था प्रतिनिधी व उत्पादकांचा भरघोस प्रतिसाद*
*बामणी दि.२४:*
गोकुळ दूध संघाच्या म्हैस दुधाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. म्हैस दूध संकलन वाढीचा संकल्प करूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.गोकुळ दूध संघाची संपर्क सभा बामणी ता. कागल येथे आर. के. मंगल कार्यालयात झाली. या सभेला कागल तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादकांनी भरघोस प्रतिसाद दिला. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, गोकुळच्या दुधाला चांगली चव आहे, ती कोणत्याही राज्यातील दुधाला नाही. तसेच गोकुळच्या म्हैस दुधाला मुंबई, पुणे या मोठ्या शहरामध्ये जास्त मागणी आहे. संघाचे म्हैस दूधाचे प्रमाण अधिक वाढले पाहिजे आहे. त्यासाठी जिल्हा बँकेमध्ये ५०० कोटीची तरतूद केली असून संघाच्या विविध योजना व स्व.आनंदराव पाटील – चुयेकर म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून म्हैस दूध वाढ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, संघाकडून म्हैस दूध वाढ कार्यक्रम राबविले जात आहेत. दूध उत्पादकांनी म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन संघाकडून केले जाईल. गोकुळच्या दूध उत्पादकांनी संघामार्फत राबवलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन म्हैस दूध उत्पादन वाढीवर भर द्यावा. शासनाकडून जे काय दुधासाठी अनुदान मिळाले आहे, तसे म्हैस दुधासाठी शासनाकडून अनुदान मिळण्यासाठीही पाठपुरावा करू. गोकुळमार्फत आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाद्वारे गायी -म्हशींना गर्भ प्रत्यारोपण ही योजना प्रभावीपणे राबविणार असून यामुळे दूध उत्पादकांच्या गोठ्यामध्ये एका पिढीमध्ये उच्च वंशावळीचे जातीवंत व फक्त मादी वासरांची पैदास होणार आहे.
यावेळी संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्त, मिल्कोटेस्टर, संगणक, गुणनियंञण या विभागावर सविस्तर चर्चा होवून दूध संस्था प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.
गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुर परिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवणाऱ्या व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या विस्तार सुपरवाझर यांचा सत्कार करण्यात आला. किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, के.डी.सी.सी.बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, अधिकारी तसेच कागल तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत व प्रस्ताविक संचालक नविद मुश्रीफ यांनी केले. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक युवराज पाटील, अंबरिषसिह घाटगे यांनी मनोगते व्यक्त केली. आभार संचालक किसनराव चौगले यांनी मानले.
…………*बामणी ता. कागल येथे गोकुळ दूध संघाच्या संपर्क सभेमध्ये मार्गदर्शन करताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ. यावेळी संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, के.डी.सी.सी.बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने व संघाचे अधिकारी आदी.*
============