गोकुळ मार्फत राष्ट्रमाता जिजाऊ रथयात्रेचे स्वागत.

Spread the news

 

  1. U­

 


गोकुळ मार्फत राष्ट्रमाता जिजाऊ रथयात्रेचे स्वागत.

  •  

कोल्‍हापूर, ता.२१: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाच्या (गोकुळ) वतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समता, बुंधता प्रस्तापित करण्यासाठी सर्व जातीधर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडण्यासाठी जिजाऊ रथ १८ ते १ मे या कालावधीत भोसलेगडी, वेरुळ ते लाल महाल, पुणे असा राज्यस्तरीय समाज जोडो अभियान राज्यस्तरीय जिजाऊ रथ यात्रा सुरू झाली आहे आज राष्ट्रमाता जिजाऊ रथ कोल्हापूर मध्ये आला असता त्या रथाचे स्वागत गोकुळ परिवारा मार्फत गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ यांनी गोकुळ ताराबाई पार्क कार्यालय येथे केले. यावेळी अरुण डोंगळे यांच्या हस्ते संचालक यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला.

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांतपाटील–चुयेकर, , नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील,जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तसेच व गोकुचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

—————————————————————————————————

फोटो ओळ – राष्ट्रमाता जिजाऊ रथाचे स्वागत करताना करताना चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांतपाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, बयाजी शेळके, आदी दिसत आहेत.

—————————————————————————————————-

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!