गोखले कॉलेजचे बारावी परीक्षेत दणदणीत यश
कोल्हापूर : येथील गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. विज्ञान, कला, वाणिज्य, एचएसव्हीसी या चारही शाखेत निकालाची टक्केवारी उंचावली आहे. शाखानिहाय निकाल व पहिल्या तीन क्रमांकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
विज्ञान शाखेचा निकाल ९७.२३ टक्के इतका लागला आहे. विज्ञान शाखेतील उमेश तानाजी पोवारने ८६ टक्के, पार्थ प्रशांत काटेने ८४.१७ टक्के तर नितेश मनीष शहा व जीया चेतन जनवे यांनी प्रत्येकी ८२.५० टक्के गुण मिळवले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ८०.६९ टक्के इतका लागला. नीलम सुरेश यादवने ७८.३३ टक्के गुण मिळाले. आदित्य जगदीश भिलवडीकरने ६७ टक्के, शीतल म्हाळू कोकरेने ६६ टक्के प्राप्त आहेत.
कलाशाखेचा निकाल ७४.५४ टक्के इतका लागला. योगेश श्रीकांत सुतारने ६७.१७ टक्के, सविता दत्तात्रय शिंदेने ६५.६७ टक्के, स्वागत उत्तम खोत व आदित्य जनार्दन कांबळेने ६१ टक्के गुण मिळवले आहेत. एचएसव्हीसी शाखेचा निकाल ९२.३० टक्के लागला. यामध्ये सावरी अमर संकपाळने ८१.५० टक्के, श्रावणी शिवप्रसाद पुरेकरने ८०.५० टक्के तर अनुष्का अजिंक्य शेणॉय ७३.६७ टक्के गुण मिळवले आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, संस्थेच्या चेअरमन डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन सदस्य दौलत देसाई, कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, उपप्राचार्य एन. टी. पाटील, पर्यवेक्षक एस. एन. मोरे यांचे प्रोत्साहन लाभले.