आपल्या शुभेच्छा राहू द्या! शाहू महाराजांनी घेतली काडसिद्धेश्वर स्वामींची भेट !!

Spread the news

आपल्या शुभेच्छा राहू द्या!

शाहू महाराजांनी घेतली काडसिद्धेश्वर स्वामींची भेट !!

स्वामीजींनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी रविवारी कणेरी मठाला
सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची भेट घेतली. मठातर्फे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी शाहू महाराज
यांचा सत्कार केला. याप्रसंगी शाहू महाराज यांनी, ‘ आपल्या शुभेच्छा माझ्या पाठीशी राहू द्या ’अशा भावना व्यक्त केल्या.
मठावर आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित लोकांना त्यांनी नमस्कार केला. तेव्हा उपस्थित नागरिकांनी टाळयांचा गजर करत त्यांचे स्वागत केले.

पौर्णिमेनिमित्त मठावर विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. रविवारी मठावरील हॉलमध्ये प्रवचनाचा कार्यक्रम होता. अदृश्य
काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सायंकाळी श्रीमंत शाहू
महाराज यांनी कणेरी मठ येथे भेट दिली. यावेळी प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होता. शाहू महाराजांनी या कार्यक्रमांना काही वेळ उपस्थिती
दर्शविली. यानंतर काडसिद्धेश्वर महाराज यांच्या हस्ते शाहू महाराज यांचा सत्कार केला.
याप्रसंगी माजी मंत्री
अण्णासाहेब डांगे उपस्थित होते.

काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले,‘श्रीमंत शाहू महाराज व आपला गेल्या कित्येक वर्षापासून परिचय आहे. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही
भेटत असतो. मठावरही ते दोन-तीन वेळेला येऊन गेले आहेत. शाहू महाराज अंत्यत मृदू स्वभावाचे आहेत. त्यांनी आज मठाला भेट दिली
आहे. त्यांचा गौरव करताना आनंद होत आहे.’ यावेळी शाहू महाराज यांनी, नमस्कार करत ‘ आपल्या शुभेच्छा राहू द्या. पुन्हा मठाला भेट
देण्यासाठी येऊ ’अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी उपस्थित नागरिकांना नमस्कार केला. उपस्थितांनी टाळयांचा गजर करत पुढील
वाटचालीसाठी शाहू महाराज यांना सदिच्छा व्यक्त केल्या.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!