गिरीश चितळे यांची CII महाराष्ट्र राज्य परिषदेवर निवड

Spread the news

गिरीश चितळे यांची CII महाराष्ट्र राज्य परिषदेवर निवड

  1. U­

 

सांगली

  •  

B G Chitale Dairies Pvt. Ltd. चे संचालक गिरीश चितळे यांची Confederation of Indian Industry (CII) महाराष्ट्र राज्य परिषदेवर 2025-26 साठी निवड झाली आहे.

CII ही भारतातील अग्रगण्य औद्योगिक संघटना असून, 1895 पासून ती उद्योग आणि व्यवसायाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत आहे. भारत सरकार, राज्य सरकारे आणि विविध उद्योगसंस्थांशी भागीदारी करून धोरण निर्मिती, कौशल्यविकास, संशोधन, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संधी वाढवणे यासाठी CII महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. महाराष्ट्र राज्य परिषदेच्या माध्यमातून राज्यातील औद्योगिक वाढ, कृषी आणि ग्रामीण विकास, तसेच स्टार्टअप्स आणि उद्योजकतेला चालना देण्यावर भर दिला जातो.

चितळे डेअरी हा १९३९ साली स्थापन झालेला आणि चार पिढ्यांचा वारसा असलेला, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कृषी प्रक्रिया व दुग्ध व्यवसाय समूह आहे. उच्च दर्जाच्या दुग्धजन्य पदार्थांसह शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि तांत्रिक सक्षमीकरणावर हा उद्योग भर देतो. डेटा-अनॅलिटिक्सवर आधारित दूध संकलन प्रणाली, पशुपालन व्यवस्थापनासाठी डिजिटायझेशन, तसेच स्मार्ट फार्मिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर ही चितळे डेअरीची खास वैशिष्ट्ये आहेत.

शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान, समतोल पशुखाद्य, उत्तम वंशावळ उपलब्ध करून देणे, आरोग्य व्यवस्थापन व आधुनिक दुग्धशाळा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आणि दुधाच्या गुणवत्तेनुसार पारदर्शक दर देण्याच्या प्रक्रियेत चितळे डेअरीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. RFID-आधारित गायींचे ट्रॅकिंग, IoT-सक्षम दूध तपासणी यंत्रणा आणि संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित करणारी अत्याधुनिक यंत्रसामग्री या उद्योगाच्या तांत्रिक प्रगतीची उदाहरणे आहेत.

गिरीश चितळे हे व्यवस्थापन आणि विपणन क्षेत्रातील व्यापक अनुभव असलेले उद्योजक आहेत. त्यांनी व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, प्रक्रियांचे सुलभीकरण आणि ग्राहककेंद्रित दृष्टिकोनातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यांचा विशेष भर कृषी आणि ग्रामीण भागातील उद्योजकता, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञानावर आधारित विकासावर आहे.

CII महाराष्ट्र राज्य परिषदेवर त्यांच्या निवडीमुळे कृषी आणि ग्रामीण उद्योजकता, कौशल्यविकास यांसाठी धोरणात्मक पुढाकार घेण्याची संधी मिळणार आहे.

संचालक या भूमिकेत, त्यांनी कृषी व ग्रामीण उद्योजकतेला नवे दृष्टीकोन देण्यासाठी कौशल्यविकासाच्या नव्या संधी शोधणे, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्पादनक्षमता वाढवणे आणि धोरणात्मक निर्णय घेत महाराष्ट्रातील उद्योग, कृषी आणि ग्रामीण विकासाला गती देणे यावर भर देण्याचा विचार केला आहे.

या नव्या जबाबदारीद्वारे गिरीश चितळे महाराष्ट्रातील उद्योग, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि क्रीडा-कलाक्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी योगदान देण्यास प्रयत्नशील असतील.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!