वंशावळ,नोंदी ठेवणारे हेळवी होणार हायटेक. वाशीतील धार पवार पाटील समाजाच्या वतीने लॅपटॉप संगणक प्रदान.

Spread the news

वंशावळ,नोंदी ठेवणारे हेळवी होणार हायटेक.

वाशीतील धार पवार पाटील समाजाच्या वतीने लॅपटॉप संगणक प्रदान.

वाशी-

हजारो वर्षांच्या पूर्वजांपासून वंशावळी व कुळाच्या नोंदी ठेवणारे हेळवी आता हायटेक होणार आहेत. या हेळव्यांना वाशीतील धार पवार पाटील समाजाच्या वतीने लॅपटॉप संगणक प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाहू चरित्र अभ्यासक प्रा. डॉ. जे. के. पवार उपस्थित होते.
सर्व समाजातील पूर्वजांच्या नोंदी हेळवी समाजाने अत्यंत निष्ठेने आजवर ठेवल्या आहेत. आता २१ व्या शतकात नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नोंदी ठेवण्यासाठी त्यांना लॅपटॉप देण्याचे आदर्शवत कार्य वाशी गावातील लोकांनी केले आहे. लॅपटॉप मुळे इतिहासातील नोंदी डिजिटल होतील असे मत प्रा.डॉ. जे. के. पवार यांनी व्यक्त केले.

हेळवी समाजाने वंशपरंपरा, चालीरीती – रीवाज, समाजाचे स्थलांतर व शौर्य गाथा यांमधून संस्कृती वाहकाचे काम केले. या सर्व नोंदी ग्रामपंचायतकडे नसतात पण हेळव्यांच्या दप्तरी निश्चितपणे असतात. हे दप्तर जीर्ण, कालबाह्य होत आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी हेळव्यांच्या मुलांना व्यवसाय व शिक्षणाबरोबर या नोंदी ठेवण्यासाठी लॅपटॉप भेट देण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम वाशी येथे राबविण्यात आला असल्याचे भोगावती कारखान्याचे विद्यमान संचालक श्री. बी. ए. पाटील यांनी मनोगतातून सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले. आभार विनायक पाटील यांनी मानले.
यावेळी बापूसो पाटील, संभाजी पाटील, एम बी पाटील, एम एस पाटील, शंकर पाटील, युवराज पाटील, सचिन पाटील, विलास पाटील, नारायण पाटील, किरण पाटील, रघुनाथ पाटील, प्रभाकर पाटील, अर्जुन पाटील, बजरंग हेळवी, विठ्ठल हेळवी व समाज बांधव उपस्थित होते.

चौकट

मोडी लिपी भाषेचे लिखाण लोप पावत आहे.जुने मराठी लिपीतील दप्तर जीर्ण झाले आहे. त्यामुळे चालू पिढीच्या नोंदी ठेवण्याची मोठी अडचण भेडसावत होती. पण वाशी येथील पाटील समाजाने वंशपरंपरागत नोंदी ठेवण्यासाठी लॅपटॉप भेट दिला आहे. आमची मुले शिकली असल्याने आता मागील व भविष्यातील नोंदी ठेवण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

मच्छिंद्र शिवराम हेळवी
कर्नाटक बेक्केरी.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!