शिरोळ तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास ही भूमिका घेऊन प्रामाणिकपणे काम करणार उमेदवार गणपतराव पाटील यांनी दिला जनतेला विश्वास महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन : जनतेचा तुफान प्रतिसाद

Spread the news

शिरोळ तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास ही भूमिका घेऊन प्रामाणिकपणे काम करणार

उमेदवार गणपतराव पाटील यांनी दिला जनतेला विश्वास

महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन : जनतेचा तुफान प्रतिसाद

जयसिंगपूर/ प्रतिनिधी
शिरोळ तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास घेऊन माझी प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका आहे. जयसिंगपूर येथील झोपडपट्टीचा प्रश्न, अतिक्रमण, पाण्याचा प्रश्न आणि वाढत्या विस्तारीकरणाला लक्षात घेऊन नवे उद्भवणारे प्रश्न या सर्वांच्या सोडवणुकीसाठी मी काम करणार आहे. जयसिंगपूर येथे सिटी सर्व्हे नंबर 1251 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणे, शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणे या कामी मी खंबीरपणे जनतेच्या पाठीशी राहून हे प्रश्न मार्गी लावणार आहे. एक वेळ जनतेचा, तुमचा आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या, माणुसकीचा धर्म पाळून मी पाच वर्षे तुमच्यासाठी जनतेचा सेवक म्हणून काम करेन, अशी ग्वाही उमेदवार गणपतराव पाटील यांनी दिली.
महाविकास आघाडीच्या वतीने आज जयसिंगपूर येथे पदयात्रा काढण्यात आली. जयसिंगपूर शहर आणि उपनगरातही प्रचंड मोठी पदयात्रा झाली. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. महा विकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. याला जनतेचा तुफान प्रतिसाद मिळाला. यानंतर श्री सिद्धेश्वर मंदिर येथे सांगता सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपली भूमिका मांडत असताना ते बोलत होते.
शिवसेनेच्या स्वाती सासणे म्हणाल्या, जयसिंगपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये विरोधकाकडून गैरसमज पसरवून समाजाला फसवण्याचे काम सुरू आहे. स्मारक वेगळे आणि पुतळा वेगळा हे जनतेने लक्षात घ्यावे. विरोधक दिशाभूल करीत असून त्यांना बळी न पडता गणपतराव पाटील यांच्या पाठीशी आहोत हे मतभेटीतून दाखवून त्यांना निवडून देऊया.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी शिरोळ तालुका पिंजून काढला असून गणपतराव पाटील यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे सांगून डोळ्यात तेल घालून शेवटचे दोन दिवस चांगले काम करा आणि गणपतराव पाटील यांना निवडून द्या असे आवाहन केले. दिगंबर सकट यांनी शिरोळ तालुक्यातील धूर्त बुद्धीचे राजकारण थांबवण्यासाठी आणि तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले. आम आदमी पक्षाचे सुदर्शन कदम यांनी ही लढाई झुंडशाही विरोधातील असून संविधान वाचवण्यासाठी जनता दादांच्या पाठीशी राहील आणि त्यांना निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला. सर्जेराव पवार यांनी आभार मानले.
नांदणी नाक्यापासून पदयात्रेला सुरुवात झाली. यानंतर शाळा नंबर नऊ, कुंभार गल्ली, सुदर्शन चौक, शिवशक्ती कॉलनी, समडोळे मळा, व्ही बॉईज, महालक्ष्मी चौक, चाँदतारा मस्जिद, हनुमान चौक, रणवीर चौक, संभाजीनगर, जयसिंगनगर, रेणुका चौक, क्रांती चौक ते सिद्धेश्वर मंदिर येथे पदयात्रेची सांगता करण्यात आली.
यावेळी हसन देसाई, अशोकराव कोळेकर, सर्जेराव पवार, मुसा डांगे, युनूस डांगे, चंद्रकांत जाधव घुणकीकर, रघुनाथ देशिंगे, संतोष जाधव, गुंडाप्पा पवार, मधुकर पाटील, राजू आवळे, कविता चौगुले, रेखा घाटगे, वैशाली जुगळे, परवीन जमादार, आक्काताई कोळी, लता माने, रेखा पाटील, राजश्री मालवेकर, सलीम नदाफ, रमेश पाटील, अर्चना संकपाळ, सागर धनवडे, बंडा मिणियार, अस्मिता पाटील, संगीता पाटील कोथळीकर, सविता पाटील कोथळीकर, राजू कोळेकर, महादेव राजमाने, विक्रमसिंह जगदाळे, विलास कांबळे, सतीश भंडारे, उदय कांबळे, पवन सुतार, प्रतीक धनवडे, निलेश तवंदकर, विजयकुमार चौगुले, दत्तात्रय कदम, अर्चना चौगुले, रंगराव पवार, दीपक भोसले, निलेश कांबळे, नंदू कदम, मंगल चिकण्णावर, मंगेश चौगुले, तेजस कुराडे, मंगल दळवी, लक्ष्मीबाई कोळेकर, संजय काळे, दिलीप पवार, अशोक शिंगाडे, विनायक भोसले, अनिल पवार, अशोक घोरपडे, महेश भोसले, सतीश नलवडे, मेजर माने, रमजान नदाफ, स्वप्निल कांबळे, प्रदीप भाटे, पिंटू वगरे, रवी वैदू, करण गोसावी, अण्णा चव्हाण, सचिन इंगवले, अनिल पवार, गणेश तकडे, गायत्री कुरुंदवाडे, अमरसिंह निकम, विशाल बल्लाळ, प्रदीप पाटील, गजानन आयगोळे, राजू गाडीवडर, रवी गाडीवडर, सुरेश पाटील, सुनील रेपे, बाळू कांबळे, शोएब हिरुकुडे, शितल कोळी, अभिजित पवार यांच्यासह जयसिंगपूर शहर व मतदार बंधू-भगिनी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!