गांधीनगर सरपंच आणि केला जनतेशी विश्वासघात ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप

Spread the news

 

गांधीनगर सरपंच आणि केला जनतेशी विश्वासघात

ग्रामपंचायत सदस्यांचा आरोप

कोल्हापूर : ” व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि स्वतःच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी सरपंच संदीप पाटोळे यांनी आमदार सतेज पाटील गटात प्रवेश केला आहे. पाटोळे यांनी गांधीनगरच्या जनतेशी गद्दारी केली आहे. गांधीनगरच्या लोकांनी त्यांना सरपंच केले होते ,आता लोक आंदोलन व लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना सरपंचपदावरून पायउतार करू. त्यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खाल्ल्याशिवाय शांत बसणार नाही” असा इशारा गांधीनगरच्या ग्रामपंचायत सदस्य व गांधीनगर एकता मंचच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
गांधीनगरच्या सरपंच संदीप पाटोळे व सदस्य गजेंद्र हेगडे यांनी काही दिवसांपूर्वी आमदार सतेज पाटील व ऋतुराज पाटील यांचे उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गांधीनगरच्या विकासासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गांधीनगर एकता मंच व भाजपच्या ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन सरपंच संदीप पाटोळे यांच्यावर आरोप केले. ग्रामपंचायत सदस्य रितू लालवानी, लक्ष्मी धामेजा, रीना अवघडे, सरिता कटेजा,, रवी मल्लानी, दीपक जमनाने, भाजपचे युवराज अडवाणी, किसान वधवा, अमित बडेजा याने संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ” भारतीय सिंधी समाज, भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन गांधीनगर एकता मंचच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. ज्यावेळी ग्रामपंचायत निवडणूक झाली तेव्हा संदीप पाटोळे यांना कोणीही ओळखत नव्हते. गांधीनगर एकता मंचमुळे त्यांना सरपंच पद मिळाले. मात्र निवडून आल्यानंतर सुरुवातीचे काही महिन्यात वगळता संदीप पाटोळे व अन्य एका सदस्याने नेहमीच विरोधी गटाशी हातमिळवणी केली. संदीप पाटोळे यांची सरपंच पदाची कारकीर्द ही प्रभावी राहिली नाही सरपंच झाल्यापासून भ्रष्टाचार व गैरकृत्याच्या माध्यमातून पैसे मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्यास सुरुवात केली होती सुरुवातीला त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते जुमानले नाहीत. शिवाय गेल्यावर्षी उपसरपंच पदाच्या निवडणूकमध्ये नेत्यांचा आदेश डावलून त्यांनी सतेज पाटील गटाला मदत केली. त्यांची पावले ओळखून त्यांच्या सरपंचपदाच्या गैरकारभाराच्या विरोधात कारवाईची मागणी करत आम्ही साऱ्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबला. यामधून आपले पद जाणार याची जाणीव त्यांना झाली होती. म्हणून त्यांनी डिजिटल सिग्नेचरचा (डीएससी) मुद्दा उपस्थित करून विरोधी गटात प्रवेश केला. वास्तविक गांधीनगरला महसुली गावाचा दर्जा प्राप्त व्हावा आणि डीएससी चा अधिकार मिळावा यासाठी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक हे गेले वर्षभर प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे. मात्र संदीप पाटोळे यांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी व भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी डीएससीचे काम केले म्हणून तिकडे गेलो असे खोटे सांगत आहेत लोकांची दिशाभूल करत आहेत. सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या कालावधीत गांधीनगरच्या विकासाचे एकही मोठे काम झाले नाही. ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढीसाठी भरीव प्रयत्न नाहीत. विकासात्मक कार्यक्रम नाही. त्यांच्या सरपंच पदाच्या कालावधीत ग्रामपंचायतीच्या 53 कामगारांचे पगार भागवताना अडचणी येत होत्या. त्यांनी गांधीनगरवासियांचा विश्वासघात केला आहे. त्यांना सरपंच करण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. सिंधी समाजाने, भाजपाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र त्यांनी गद्दारी केली, त्यांची त्यांना जागा समजली पाहिजे. त्यांना पदावरू पायउतार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.”


Spread the news

You may also like

error: Content is protected !!