*कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर*
कोल्हापूर
केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी नव्याने मंजूर करण्यात आला आहे
केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी १०० ई बसेसचा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनसाठी १८ कोटी रुपयांच्या निधीला यापूर्वी केंद्र शासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. खासदार धनंजय महाडिक यांनी केएमटीला 100 ई बसेस मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या केएमटीला केंद्र सरकारकडून 100 ई बसेस आणि त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन साठी निधी मंजूर झाला आहे. आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी नव्याने मंजूर करण्यात आला आहे. त्याचे पत्र दिनांक २१ जून २०२४ रोजी कोल्हापूर महानगरपालिकेला प्राप्त झाले.
कोल्हापूर मधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी आणि केएमटीला उर्जितावस्था मिळावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला व्यापक यश आले आहे. त्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खासदार महाडिक यांनी जाहीर आभार मानले आहेत.